टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी शिवारातून घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली दावणीला बांधलेले ९० हजार रुपये किमतीची एक म्हैस व दोन वर्षाची तीची रेडी,
तसेच एक जर्सी गाय व तिचे वासरू चोरट्याने रस्सी कापून चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, यापूर्वी शेळ्या चोरीचे प्रमाण वाढले होते त्याचा तपास लागला नसताना चोरट्यांनी आपला मोर्चा मोठ्या जनावराकडे वळवला असल्याने पशु पालकांमधून भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , यातील फिर्यादी गुरुदेव बिराजदार हे दिनांक १० रोजी रात्री १० वाजता जनावरांना वैरण टाकून जेवण करून झोपी गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यावर
घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बांधलेली म्हैस व एक रेडी तसेच एक जर्सी गाय व तिचे वासरू बांधलेल्या ठिकाणी दिसून आले नाहीत दोर कापून नेल्याचे फिर्यादीस दिसले.
फिर्यादीची पत्नी सविता व कुटुंबीयांनी शेजारी व परिसरात जनावरांची विचारपूस केली मात्र जनावरे मिळून आले नाहीत.
अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
पसरले माहिती यापूर्वी घरनिरी व मंगळवेढा शहरपरिसर , ब्रह्मपुरी व अन्य ठिकाणाहून पशुपालकांच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत.
ती अद्यापही सापडल्या नसताना चोरट्यांनी मोठ्या जनावरांकडे आपला मोर्चा वळवला यामुळे पशुपालकांनी जनावरे नेमकी कुठे बांधावयाची ? हा प्रश्न पशुपालकाला उभा आहे..
पोलीस प्रशासनाने जनावरे चोरनाऱ्या चोरट्याला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज