माणूस संवेदनहीन होत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली आहे. दुचाकी अपघातानंतर अपघातग्रस्त कुटुंबाची 41 हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
इंदापूर तालुक्यातीलच रहिवाशी असणाऱ्या 52 वर्षीय बाळुबाई महादेव आनरसे यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
बाळुबाई आनरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं लोणी देवकर इथं एक भाजीपाल्याचं दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकानातील काम आटोपून बाळुबाई आनरसे या आपल्या नातवंडांसह दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या.
त्यावेळी वाटतेच आनसरे कुटुंबाच्या दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात ते जखमी झाले. याचाच फायदा घेत काही अनोखळी इसम तिथे आले आणि त्यांनी आनरसे यांच्याकडील सोने आणि मोबाईल असा 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
जखमी कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. तसंच या घटनेबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी इंदापूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज