मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील रामकृष्ण नगर येथे घराचे सेफ्टी दरावाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने,
घड्याळ असा एकूण 2 लाख 31 हजार 741 किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटयाचा शोध घेण्यासाठी सोलापूरहून श्वानपथक मागविण्यात आले होते.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी मनोज आवळेकर यांचे कारखाना रोड रामकृष्ण नगर येथे घर असून दि.9 रोजी रात्री जेवणखाण करुन 11.30 वाजता घराचे सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून आवळेकर कुटूंब झोपी गेले.
फिर्यादी हे रात्री 12.55 वाजता अचानक जागे झाल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावल्याचे निदर्शनास आले.
यावेळी फिर्यादीने भाडेकरु विजय ठेंगील यांना कॉल करुन खाली येवून कडी काढण्यास सांगितले. यावेळी सेफ्टी दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले.
रुममध्ये जावून पाहिले असता पत्र्याचे कपाट व लॉकर उघडे दिसले. ड्रॉवर मध्ये ठेवलेले 20 हजार 797 रुपये किंमतीची अंगठी, 54 हजार 40 रुपये किंमतीच्या 3 अंगठ्या, 66 हजार 816 रुपये किंमतीचा लक्ष्मी हार,
20 हजार 600 रुपये किंमतीची अंगठी, 65 हजार 338 रुपये किंमतीचे मंगळसुत्र,4 हजार 150 किंमतीचे हातातील घड्याळ असा एकूण 2 लाख 31 हजार 741 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरटयाने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान चोरट्याच्या शोधासाठी सोलापूर येथून श्वान पथक व ठसे तज्ञ मागविण्यात आले होते. मध्यंतरी पोलीसांनी भरदिवसा घरफोडी करणार्या चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर काही दिवस नागरिकांनी चोर्याबाबत सुटकेचा निश्वा:स सोडला होता. मात्र या झालेल्या चोरीमुळे पुन्हा दहशतीखाली नागरिक असल्याचे चित्र आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज