टीम मंगळवेढा टाईम्स।
ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम सुरू आहे यातच गावाजवळच्या शिवारात सध्या चोरट्यांचा ज्वारीचे कणसे खुडून नेण्याचा सपाटा सुरू असून याबाबत अशा घटनांपासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला निवेदन दिले.
बळीराजा अनेक अडचणींना तोंड देत शेतामध्ये उत्पादन निर्माण करीत आहेत मात्र परिसरातील पारधी सतत फिरत ज्या शेतकऱ्यांची ज्वारी काढून झालेली आहे.
याची माहिती घेत आहेत सुगी सुरू असताना मशीनवर मळणी करताना देखील अनेक पारधी शेतकऱ्याला दमदाटी करून त्यांच्याकडून जबरदस्तीने ज्वारी मागित असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
अशातच मंगळवेढा शहरातील मनोज घुले या शेतकऱ्याच्या शेतामधील उभ्या पिकातील कणसे खोडून नेण्याचा प्रकार घडल्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये याबाबत निवेदन दिले.
या निवेदनामध्ये रात्री या रात्री पारधी समाजाचे लोक शेतामध्ये जाऊन शेतीचे नुकसान करीत आहेत दिवसा मळणी सुरू असताना शेतकऱ्यांना दमदाटी करून ज्वारी घेऊन जात आहेत.
या प्रकारामुळे शहरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत हा प्रकार नव्याने घडत नसून मागील दोन वर्षापासून सातत्याने हे प्रकार सुगीच्या हंगामात होत आहेत.
यावर प्रशिक्षित म्हणून कार्यभार घेतलेल्या नयोमी साटम यांनी त्यांच्या कार्यकाळात व्यवहारातील विविध भागांमध्ये पोलिसांच्या नेमणुका केल्या होत्या त्यामुळे त्या काळात अशा प्रकारांना आळा बसला होता त्यामुळे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तातडीने याबाबत उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या निवेदनावर दामाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे, नितीन सुरवसे, मारुती वाकडे, गणपत आवताडे, प्रवीण उन्हाळे, अरुण किल्लेदार,आप्पासाहेब चोपडे, प्रवीण हजारे, राजाभाऊ चेळेकर,
माऊली कुलकर्णी, दिलीप पाटील, चंद्रकांत पडवळे, दिगंबर यादव, राजाराम सूर्यवंशी, सतीश दत्तू ,रावसाहेब कोंडुभैरी, सतीश कट्टे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज