मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील टाकणे कुटूंबिय उपचारासाठी दवाखान्यात गेले असता ही संधी साधून चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून
लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिेने, रोख रक्कम असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयाच्या समोर व डीवायएसपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरांमध्ये चोरी झाली असून चोरांनी धाडसी चोरी केल्याचे बोलले जात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी महेश जयंत टाकणे हे व्यवसायाने चालक असून दि.23 मे रोजी पंढरपूर येथील एका खाजगी दवाखान्यात फिर्यादीची पत्नी अश्विनी उपचारासाठी दाखल होती.
या दरम्यान फिर्यादीने घराला कुलूप लावून ते दवाखान्यात गेले होते. दि.28 रोजी सकाळी 10 वाजता फिर्यादीचा मुलगा अमित घराची स्वच्छता करण्यासाठी गेला होता. यावेळी साहित्य व्यवस्थीत होते.
मात्र दि.30 मेच्या रात्री 10 वाजता फिर्यादीची पत्नी अश्विनी हिस घरमालक मधूकर घुले यांनी फोन करुन सांगितले तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे.
तुम्ही घरी लवकर या, लागलीच फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा अमित रात्री 11 वाजता राहते घरी आले तेव्हां घराचा दरवाजा उघडा होता.
फिर्यादीने घरात जावून पाहिले असता आतील खोलीत ठेवलेले लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटलेले होते. कपाट तपासले असता कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने,
रोख रक्कम ठेवलेल्या ठिकाणी मिळून आले नाही. तसेच ब्रम्हदेवदादा माने बँकेच्या एफडीच्या पावत्या मिळून आल्या नाहीत.
अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन 65 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज