टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे बंद घराचे कुलूप काढून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भर दिवसा चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान बोराळे नाक्यावर भर दिवसा प्रवासी महिलेच्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 66 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा हुलजंतंी येथे चोरीची घटना घडल्याने नागरिकांमधून भितीचे वातावरण पसरले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी लायाप्पा गणपती इंगळे (वय 60 वर्षे) व त्यांची पत्नी गौराबाई हे दि.4 रोजी भाजीपाला काढण्यासाठी घराला कुलूप काढण्यासाठी शेतात गेले होते.
हे कुुटुंबिय भाजीपाला विक्री करून दैनंदिन उपजिविका करतात.नित्य नियमाप्रमाणे भाजी काढण्यास शेतात गेल्यावर चोरटयांनी लक्ष ठेवून दुपारी 12.00 वा. घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किमतीच्या
अर्धा तोळयाच्या 7 पिळयाच्या अंगठया,15 हजार रुपये किमतीची पाऊण तोळयाची बोरमाळ,10 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळयाचे झुमके,2 हजार रुपये किमतीचे 5 गुंज वजनाचे बदाम,व 30 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भर दिवसा घरफोडी झाल्याने हुलजंती ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.बोराळे नाक्यावरही सोलापूरहून आजारी वडीलांना पाहण्यासाठी आलेल्या एका तरूण मुलीचे तीन महिलांनी पर्समधील 66 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता.
लागोपाट घडलेल्या दोन चोरीच्या घटनेमुळे तपास करणे पोलिसांना आव्हान ठरले आहे.यापुर्वीही अनेक चोर्या व दरोडे पडले आहेत.
यातील चोरटे पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने चोरटयांचे बळ वाढत जावून सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाढत्या चोर्यांना आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवून चोरटयांना जेरबंद करून चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीला मिळवून दयावा अशी मागणी होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज