टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले २ लाख ६ हजार ५१० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान एका महिन्यात दोन घरफोड्या झाल्याने चोरट्यांचा शोध घेणे पोलीसांना एक आव्हान ठरले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रंजना बापूसाहेब आसबे (वय ५७, रा. मुंबई खारघर) या दि.१९ जानेवारी रोजी मुंबईहून आल्या होत्या. त्यावेळी खर्चासाठी काही पैसे व सोन्याचे दागिने सोबत आणून काळ्या रंगाच्या पर्समध्ये कपाटात ठेवले होते.
दि.४ रोजी सकाळी ८ वाजता किरकोळ सामान घेण्यासाठी फिर्यादीने कपाटातील पर्स घेवून पैसे घेण्याचा प्रयत्न केला असता तेव्हां कपाटही उघडे दिसले.
दुपारी ४ वाजता आईच्या घरातील कपाटात काळ्या रंगाची कातडी पर्स ठेवली असल्याने त्यामधील पैसे घेण्यास गेल्यावर सदरची पर्स कपाटात दिसून आली नाही. त्यामुळे सर्व घरात शोध घेतला परंतू पर्स मिळून आली नाही.
फिर्यादीच्या आईस अर्धांगवायू असल्याने तिची देखभाल करत असताना घराचा मुख्य दरवाजा अनावधनाने उघडा राहिला होता. सदर कपाटही उघडे होते त्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करुन
पर्समध्ये ठेवलेले ६ हजार ५१० रोख रक्कम, १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे साडे तीन तोळे वजनाचे गंठण, ५० हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, २५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची कर्णफुले असा एकूण २ लाख ६ हजार ५१० रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान यापुर्वीही मरवडेत घरफोडी होवून मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. अदयापही त्या चोरट्यांचा शोध घेण्यास तपास अधिकाऱ्याला अपयश आले आहे.
पुन्हा चोरीचा प्रकार घडल्याने मरवडे ग्रामस्थ चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र आहे. परिणामी पोलीस प्रशासनाने या तरी चोरीचा छडा लावून नागरिकांना दिलासा दयावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज