मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे हरभरा पीक काढून ठेवलेले चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्याने शिवारात शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी हरभऱ्याची पिके काढून शेतात ढीग लावले असून या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी वर्ग धास्तावून गेला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी गणेश विष्णू कोंडूभैरी (रा. मंगळवेढा) मंगळवेढा शिवारात बोराळे रोडवर जमीन गट नं.१८१२ मध्ये तीन एकर हरभरा पीक काढून ढिगारा लावला होता.

दि.९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते सुर्योदया पुर्वी अज्ञात चोरट्याने तीन एकरातील ढिगारा लावलेले १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे हरभरा पीक मुद्दाम लबाडीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार घडला आहे.

याचा अधिक तपास यांची पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत. दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे काळ्या शिवारात जिकडे पहावे तिकडे हरभऱ्या सारखी पिके काढून शिवारात पडली आहेत.

रात्रीच्या वेळी चोरटे या संधीचा गैरफायदा उठवत आहेत. शेतकऱ्यांनी या पीक चोरीमुळे मोठी धास्ती घेतली असून पोलीसांनी रात्रीची गस्त काळ्या शिवाराकडे घालण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून पुढे येत आहे.

चोरट्याने हरभरा पीक वाहनातून भरुन नेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस या चोरीचा शोध लावणार का? याबाबत शेतकरी वर्गातून प्रश्न विचारला जात आहे.

यापुर्वीही शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी साठा करुन ठेवलेली मका चोरट्यांनी चोरुन नेल्याच्या तक्रारी दाखल असूनही पोलीसांना अदयाप त्या चोरट्यांचा शोध घेता आला नाही, त्यामुळे पोलीसांना हरभरा पिकाचा चोरटा तरी सापडणार का? असा खोचक सवाल सुज्ञ नागरिक व शेतकरी वर्गातून केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











