टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा बसस्थानकावरुन जाणाऱ्या मंगळवेढा-जत या बसमध्ये चढताना एका ४६ वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले १० लाख ८ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविण्याचा प्रकार घडला असून

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावरील प्रवाशांचे दागिने चोरण्याची मालिका संपता संपत नसल्यामुळे प्रवाशी वर्ग धास्तावला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी महिला स्नेहा रामचंद्र शिंदे (वय ४६, रा. जुळे सोलापूर) ही तिच्या मुलाबा मुलाबाळासह व तिचा दीर पिराजी शिंदे (रा. यळवी ता. जत) यांच्यासह सोलापूर येथून सकाळी ११.३० वाजता फिर्यादी सोलापूर-सांगोला बसमध्ये बसून मंगळवेढ्याकडे निघाली होती.

यावेळी सीटवर बसल्यानंतर तिच्या पर्समध्ये १० लाख ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते. दुपारी १.३० वाजता मंगळवेढा येथील बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का ? याची खातरजमा केल्यावर दागिने होते.

दुपारी २ वाजता मंगळवेढा-जत या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्सची चैन बंद केलेली होती. त्यावेळी फिर्यादीने पर्समध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चैन उघडून पाहिल्यावर त्यामधील ठेवलेले सोने दिसून आले नाही.

यावेळी खात्री पटली की अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडून चोरुन नेले आहे. यामध्ये १ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचे गंठण, ७० हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण, ७७ हजार रुपये किंमतीच्या बांगड्या, २१ हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाच्या बांगड्या, १ लाख १९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट, १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे लॉकेट,
४२ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम वजनाचे लॉकेट, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे वेढणी अंगठी, १४ हजार रुपये किंमतीचे दोन नग वेढणी अंगठी असा एकूण १० लाख ८ हजार रुपये किंमतीचा पर्स मध्ये ठेवलेला सोन्याचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बसस्थानकावर यापुर्वी अनेक महिलांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला असून चोरीची नोंद पोलीसात होते मात्र त्याचा आजतागायत चोरीचा तपास पोलीसांनी न लावल्यामुळे चोरीची मालिका थांबता थांबेना अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर येत आहे.
मागील चार दिवसापुर्वीच तेथे दागिने चोरण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. येथे नेमलेले पोलीस ड्यूटी दरम्यान जाग्यावर थांबत नसल्यामुळे चोरटे याचा फायदा घेवून आपले उखळ पांढरे करत असल्याच्या तक्रारी आहेत.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून येथील पोलीस प्रशासनास मार्गदर्शन करुन येथील होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार रवी माने, पोलीस अंमलदार मनोज राठोड, सुरज रामगोंडे यांचे पथक मंगळवेढ्यात सोमवारी दाखल झाले.

या पथकाने बसस्थानकामधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन सदर चोरीचा तपास करण्याचा विशेष प्रयत्न केला. रात्री उशीरा पर्यंत हे पथक बसस्थानकावर ठाण मांडून होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














