टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावातील घर फोडून ब्रिटिशकालीन राजे-महाराजांच्या कालावधीतील चांदीचे नाणी चोरल्याप्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख 2 हजार 180 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
येलप्पा ऊर्फ खल्या अद्रक शिंदे (वय 40, रा. कर्नाटक, सध्या दत्त नगर, मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दि. 27 मार्च रात्री 10.20 ते दि. 28 मार्च 2022 पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान मारोळी येथे अज्ञात चोरट्यांनी संपता लक्ष्मण पांढरे (वय 42) व त्यांचे शेजारी राहणारे मारुती यशवंत शिंदे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंयंडा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने,नाणी आणि रोख रक्कम चोरून नेली होती.
यलप्पा शिंदे याला पंढरपूर येथे जाऊन अटक केली , चौकशीत त्याने लक्ष्मी दहिवडी , सलगर (ब्रु.), मंगळवेढा व तेलगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे असे एकूण पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.27 ते 28 मार्च 22 चे दरम्यान मारोळी येथे अज्ञात चोरटयांनी संपता पांढरे, वय 42 व त्यांचे शेजारचे मारूती शिंदे या दोघांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून 91,800 रू. किं.
सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि सुहास जगताप यांनी
गुन्हे शाखेकडील सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथकास सांगोला व मंगळवेढा या पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या.सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक मोहोळ भागात असताना त्यांना त्यांचे
गोपनीय बातमीदारामार्फत मारोळी येथील घरफोडी चोरीचा गुन्हा हा रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगाराने व त्याचे साथीदार मिळून केला असून तो सध्या पंढरपूर येथील तीन रस्ता जवळील मोकळया मैदानामध्ये राहवयास असून तेथील झोपडीमध्ये असल्याची बातमी मिळाल्यावरून
रविंद्र मांजरे व त्यांचे पथक तेथे जावून येलप्पा उर्फ खल्या अद्रक शिंदे वय – 40 वर्षे, सध्या रा. दत्तनगर मोहोळ, जि. सोलापुर मूळ रा. कर्नाटक त्याने त्याचे इतर साथीदार सोबत घेवून मारोळी येथील घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले.
अधिक तपासात त्यानी लक्ष्मीदहिवडी, सलगर ब्रु ता.मंगळवेढा व तेलगांव ता.उत्तर सोलापूर असे एकूण 05 ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल दिली.
त्याचेकडून वरील सर्व गुन्हयांत मालापैकी एकूण 24 ग्रॅम सोन्याचे दागिने व 123 चांदीचे नाणी 1420 ग्रॅम नाणी असा एकूण 2,02,180 रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी विरूध्द कामती ,अलमेल व अफजलपूर (कर्नाटक)येथे गुन्हे दाखल आहेत
सदरची उल्लेखणीय कामगिरी गुन्हे शाखेचे पो.नि सुहास जगताप, मंगळवेढ्याचे पो. नि. रणजित माने यांचे नेतृत्वाखाली स.पो. नि. रविंद्र मांजरे, सफौ/ खाजा मुजावर, पोहेकाॅ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख,दत्ता येलपल्ले यांनी बजावली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज