टीम मंगळवेढा टाईम्स ।
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना 4 विकेटसने धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या विजयात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली आहे.
कारण कोहलीने 84 धावांची अर्धशतकीय आणि अय्यरने 45 धावांची खेळी केली. या विजयानंतर टीम इंडिया फायनलमध्ये तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. कारण शुभमन गील अवघ्या 8 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या बेनच्या बॉलवर आऊट झाला होता. गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला होता.
विराट आणि रोहित मैदानात टिचून फलंदाची करतील अशी अपेक्षा होती. मात्र रोहित शर्मा कूपर कॉनोलीच्या बॉलवर 28 धावांवर बाद झाला.त्यानंतरल श्रेयर अय्यर मैदानात आला होता. यावेळी दोघांनी टीम इंडियाचा डाव चांगला साभाळला.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने 14 वर्षाचा वनवास संपवला. आयसीसीच्या स्पर्धेत नॉकऑउट फेरीत गेल्या 14 वर्षापासून भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला नव्हता.
काल भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास घडवला. भारताने याआधी 2011च्या वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा अहमदाबाद येथे पराभव केला होता.
भारताने 2011च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटनी पराभव केला होता. त्यानंतर आयसीसीच्या स्पर्धेत बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा नकोसा असलेला रेकॉर्ड आज भारताने बदलून टाकले.
या विजयाबरोबर भारत हा असा पहिला संघ ठरला आहे जो तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलमध्ये पोहोचला आहे. इतक नाही तर टीम इंडियाची आयसीसी स्पर्धेची ही सलग तिसरी फायनल आहे.
याआधी भारत २०२३च्या वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचला होता. तेथे ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. आणि आता भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३ मध्ये इंग्लंड त्यानंतर २०१७ मध्ये भारताचा फायनलचा सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला होता.
आता भारतीय संघाने सेमीफायनलच्या साामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान भारताचा फायनलचा सामना केव्हा, कुठे आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.
फायनल केव्हा, कुठे अन् कधी होणार?
भारताचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह भारताने दणक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे . या सामन्यात विजय मिळवणारा संघ ९ मार्चला भारतीय संघाविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे.
केव्हा होणार फायनलचा सामना ?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार आहे.
कुठे होणार सामना?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. जर भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला नसता, तर हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला गेला असता. मात्र आता भारताने फायनलमध्ये प्रवेश केल्याने हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे.
या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरुवात होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज