टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे.
आज १४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान होईपर्यंत हे निर्बंध शिथिल ठेवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कडक निर्बंधांना ब्रेक द चेन असे नाव दिले आहे.
राज्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक असल्याने नियम शिथिल करण्यात आले आहेत.
मात्र, मतदान झाल्यानंतर तेथेही हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
एक अपवाद आपल्याला करावा लागणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक असल्याने तेथे आपण काही दिवसांसाठी शिथिलता देत आहोत.
या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी भारत भालके यांचेही कोरोनामुळेच निधन झाले. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले, येत्या 2-4 दिवसांत तेथे मतदान होत आहे.
मात्र, मतदान झाल्यानंतर तिकडेही हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. त्यामुळेच, आपण मला आजपर्यंत जसं सहकार्य केलं, तसंच यापुढेही करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भात परिपूर्ण नियमावली जाहीर करुन तेथील नागरिकांना याबाबत अवगत करतील.
मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनवर बोलताना आचारसंहितेचा भंग केला? प्रवीण दरेकरांनी केला आरोप!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मात्र, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा देखील भंग केल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत बोलताना भारत भालके यांचं नाव घेतलं. पंढरपूर निवडणुकीसाठी अपवाद करण्याचं देखील कारण नव्हतं.
पण मुख्यमंत्र्यांनी भारत भालके यांचं नाव घेणं हा आचारसंहितेचा भंग आहे का? हे तपासावं लागेल”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनवर देखील टीका केली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज