टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मी आमदार झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात विकास काय असतो तो करूनच दाखवणार असा विश्वास उमेदवार अनिल सावंत यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ गावभेट दौऱ्यात मंगळवेढा शहरातील मारुती पटांगणात आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी खा.धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल शहा, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस फिरोज मुलाणी, उबाठा शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर, लवंगीचे आप्पासाहेब माने, शिवसेनेचे रामचंद्र जाधव, महिला तालुकाध्यक्ष संगीता कट्टे, स्मिता अवघडे, ह.भ.प मोहनानंद महाराज, कार्याध्यक्ष संतोष रंदवे,
माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर काझी, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष वृषाली इंगळे, जिल्हाध्यक्ष अण्णा शिरसट, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटिल, चंद्रशेखर कोंडूभैरी, सुरेश कट्टे, विजय बुरकुल, जमीर इनामदार, पंडीत गवळी, माणीक गुंगे, आजी माजी नगरसेवक आदीजन उपस्थित होत.
सावंत पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील अनेक जेष्ठ लोकांनी योगदान दिले आहे. त्या योगदानासाठी मी काम करणार आहे.
23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मंगळवेढा शहरातील गटारी व्यवस्था, रस्ते व्यवस्था, पाणी व्यवस्थेला प्राधान्य देणार आहे. पंढरपूर देव भूमी व मंगळवेढा संत भूमीचा विकास करण्यासाठी मला आमदार करा असे आवाहन केले.
दोन्ही तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी येणाऱ्या काळात नवीन उद्योग सुरु करुन प्रत्येक तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेती संदर्भात वेगवेगळे प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी काम करणार आहे.
मंगळवेढा शहरात व तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे. आता नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. आता जनतेला विकास करून दाखवणार असून एकदा संधी देऊन बघा संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे सावंत म्हणाले.
काँग्रेसचे फिरोज मुलाणी बोलताना म्हणाले की, भाजप सरकारने जनतेची लूट केली आहे, मंगळवेढा तालुक्यातील योजना मार्गी न लावता केवळ दिशाभूल केली आहे. महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारक या सरकारने जाणून बुजून निधी दिला जात नाही. या दोन्ही संतांचे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरतात यासाठी हे स्मारक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुका विकासापासून वंचित आहे अनिल सावंत आमदार झाल्यानंतर हे सर्व प्रश्न मार्गी लागतील.
भगीरथ भालके हा बंडखोर उमेदवार आमच्या पक्षाने आमच्यावे लादला. काँग्रेसचे पदाधिकारी अनिल सावंत यांचा प्रचार करत असल्याची माहिती देखील मुलाणी यांनी दिली.
माजी मंत्री ढोबळे बोलताना म्हणाले की, सत्तेची मस्ती असणाऱ्या आमदाराला आता माजी आमदार करण्याची वेळ झाली आहे. 3 हजार कोटी रुपये आणले म्हणून मतदारसंघात गाजावाजा करत असलेले आमदार आलेला निधी कुठे खर्च झाला आहे याचा हिशोब जनतेला द्यावा.
शरद पवार यांनी नेहमीच मंगळवेढा तालुक्यावर प्रेम केले आहे. अडीअडचणी काळात साथ देऊन कोणत्याच गोष्टींची कमतरता जाणवू दिली नाही.
अनिल सावंत यांनी बाहेरून येऊन आपल्या तालुक्यातील दुष्काळी भागात कारखाना सुरू केला बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याची भूमिका पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज