टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी, शर्तीमध्ये, तसेच योजनेच्या सद्यःस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून कळविण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बालविकास विभागाने दिले.
मुख्यमंत्री-लाडकी योजनेबाबत बहीण समाजमाध्यमाकडून रिल्स, व्हिडीओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला, तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत.
याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून महिला व बालविकास विभागाकडे सातत्याने विचारणा होत आहे. दरम्यान, योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये,
याकरिता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावागावांतील लाडक्या बहिणींना याबाबतची अपडेट देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पत्रान्वये सांगितले आहे.
शासनाने २१०० रुपये देण्याची घोषणा केली असून, आता यापुढील काळात २१०० रुपये मिळणार की १५०० रुपये मिळणार, याबाबतची उत्सुकता लाडक्या बहिणींना लागली आहे.
ज्या काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अशा महिलांनी बँकेशी संपर्क साधून ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाभार्थी संख्या पोहोचली साडेदहा लाखांवर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्याच्या ११ तालुक्यांतून १० लाख ८९ हजार ९५७ महिलांनी अर्ज भरला असून, यातील १० लाख ४५ हजार अर्जाना मंजुरी मिळाली आहे.
या महिलांना त्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’द्वारे पैसे जमा झाले आहेत. आता पुढील महिन्यांचे पैसे कधी जमा होणार, याबाबतची विचारणा लाडक्या बहिणींकडून होत आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज