मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून १६,६३१ पदांच्या पोलिस शिपाई भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे १०० टक्के भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही सर्व १५,६३१ पदं भरली जाणार आहेत.
१२ ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १५,६३१ पदांची पोलिस भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आज गृह विभागाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती लवकरच होणार आहे. शासनाने जारी केलेल्या निर्णयाद्वारे कोण-कोणती आणि किती पदांसाठी भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी किती शुल्क लागणार आहे याची माहिती देण्यात आली आहे.
रिक्त पदांची संख्या किती?
एकूण पदं – १५,६३१ पदं पोलिस शिपाई – १२,३९९ पदं, पोलिस शिपाई चालक -२३४ पदं, बॅण्डस्मन – २५ पदं, सशस्त्र पोलिस शिपाई – २३९३ पदं, कारागृह शिपाई – ५८० पदं
या पोलिस भरती प्रकियेसाठी या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तसंच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज