मंगळवेढा टाईम्स न्यूड ।
सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथे भीमा न नदीच्या उत्तर-दक्षिण पात्रात मातृलिंग – नावाने ओळखले जाणारे गणपती मंदिर व आहे. या स्वयंभू गणेशाची यात्रा दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आज दि.१५ जानेवारी रोजी मातोळी सिद्धापूर येथे होत आहे.

यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून लाखो भक्त ‘श्री’ च्या दर्शनासाठी येतात. भीमा नदी पात्रात पाणी नसल्याने ट्रस्ट व सिद्धापूर ग्रामपंचायत वतीने भाविकाना


स्वयंभू गणपतीचे दर्शनासाठी दोन लेनची सुरक्षित रस्ता तयार करण्यात आलेला आहे अशी माहिती मातृलिंग ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष अण्णासाहेब नांगरे-पाटील यांनी दिली.

यावेळी ट्रस्ट खजिनदार प्रकाश तळ्ळे, बापूराया चौगुले सावकार उपस्थित होते.

आज १५ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता श्री मातृलिंग गणपतीची महापूजा पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख ग्रामदैवत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आ. अभिजित पाटील, बबनराव आवताडे, प्रांताधिकारी बी. आर. माळी, पोलीस उपअधीक्षक शिवपुंजे, तहसिलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे, सिद्धापूरचे सरपंच अमगोडा पुजारी, उपसरपंच सचिन चौगुले आदी प्रमुख मान्यवर व ‘श्री’चे असंख्य भक्त उपस्थित राहणार आहेत.

यात्रेकरूंना मंगळवेढा ते सिद्धापूर, मंगळवेढा ते ब्रह्मपुरी माचणूर मार्गे यात्रेदिवशी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत सिद्धापूरकडून भाविकांनी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्रहार संघटना सिद्धापूरचे अमोगसिद्ध काकणकी मित्र परिवार यांच्याकडून दिवसभर प्रसाद वाटप व अन्नदान करण्यात येणार आहे.

यात्रेदिवशी संध्याकाळी श्रीची पालखीचे गावात आगमन होणार आहे. पालखी समोर नयनरम्य आतिषबाजी होणार आहे आणि भाविकांच्या मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक ‘मंगा व्हादरु मांगल्य बेकु’चे आयोजन संध्याकाळी १० वाजता पादुकट्टा येथे करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













