टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरात कोणी नसल्याची संधी साधत कपाटातील लॉकर उघडून १ लाख ५८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी एकजणाविरूद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची ही घटना दुपारी शिवणगी येथे घडली. शिवणगी गावामध्ये सविता नामदेव पडवळे यांचे घर असून शनिवारी दुपारी त्या शेतात गेल्या होत्या.
या दरम्यान, घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून ४० हजार रूपये किंमतीचे एक तोळा सोन्याचे गंठण, ४५ हजार रूपये किंमतीचे सव्वा तोळे सोन्याचे नेकलेस,
- २० हजार रूपये किंमतीची अर्धा तोळे सोन्याची अंगठी, ४० हजार रूपये किंमतीचे १ तोळे सोन्याची फुले झुबे, ३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे बदाम , १० हजार रूपये रोख असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली.
शेजारी राहणारा मुर्शीद कृष्णा पडोळे याने ही चोरी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनकर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज