मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळं मार्गी लागत आहेत.

निवडणूक आयोगानं तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येत आहे. सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यानंतर महापालिकेच्याही निवडणुका जाहीर होतील.

राज्यातील ग्रामीण भागात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. या ठिकाणी २ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर लगेच ३ डिसेंबरला मतमोजणी आहे.

दरम्यान, यानंतर १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात चर्चा आहे.

हिवाळी अधिवेशनही यंदा आचारसंहितेतच असणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून, प्रशासनिक तयारीला गती मिळाली आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

मात्र, १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यास अधिवेशन हे आचारसंहितेत जाईल. त्यामुळं सरकारला मोठ्या घोषणा करण्यावर मर्यादा असणार आहे.

बिहारचा आज निकाल; नितीश कुमार सत्ता राखणार की तेजस्वी यादव उधळणार गुलाल?
बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये भाजप-जेडीयू युतीचं सत्ताधारी एनडीए सरकार पुन्हा सत्तेत पुनरागमन करणार की काँग्रेस-राजद यांच्या महागठबंधनला बिहारची जनता यावेळी संधी देणार? जनतेच्या मनात नेमकं काय? हे कळणार आहे.

243 जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून 122 हा बहुमताचा आकडा आहे. बिहारमध्ये 1951 नंतर पहिल्यांदाच यंदा मतदानाचं प्रमाण वाढलं असून दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 67 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामुळं या वाढलेल्या मतदारांचा कौल कोणत्या आघाडीला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दाखवत असलं तरी काही पोलमधून तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी देखील तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्याला पसंती असल्याचं एक्झिट पोलचा अंदाज आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















