टीम मंगळवेढा टाईम्स।
कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२३ या आर्थिक वर्षाचा आदर्श व्यापारी गौरव सोहळा बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
तसेच बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्व साधारण वार्षिक अहवालाची माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली.
यावेळी श्री संत दामाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे बाजार समितीचे उपसभापती नानासो चोपडे संचालक प्रकाश जुदंळे, मनोज चव्हाण, धन्यकुमार पाटील, संचालिका कविता बेदरे, सविता यादव, संचालक बिराप्पा माळी, सहदेव लवटे, गंगाधर काकणकी, जगन्नाथ रेवे, ऋतुराज बिले ,पांडुरंग कांबळे,
बसवंत पाटील, प्रवीण कोंडुभैरी, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व बाजार समितीचे संचालक अशोक माळी, ग्रामपंचायत दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक विशाल जाधव, प्रदीपकुमार यादव,
संजय बेदरे, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष मोहन कौंडुभैरी, धनंजय पाटील, शिवाजी कोरे, शेतकरी नामदेव आवताडे, आनंद डोईफोडे, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सह विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व सदस्य ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते
सन 2023 मधील आदर्श व्यापारी पुरस्कार विजेत्यांची नावे
डाळिंब विभाग प्रथम क्रमांक मोहन शंकर माळी, द्वितीय क्रमांक राजलक्ष्मी फ्रुट कंपनी मनोज निवृत्ती पाटील, तृतीय क्रमांक शिवशंभो फ्रुट कंपनी विक्रम भुजंगराव पाटील,
भाजीपाला विभाग प्रथम क्रमांक वसंत रामचंद्र चेळेकर, द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर लक्ष्मण नागणे, तृतीय क्रमांक चेळेकर आणि कंपनी सचिन भाऊ चेळेकर,
कांदा विभाग प्रथम क्रमांक बनसोडे ट्रेडिंग कंपनी नवनाथ राजाराम बनसोडे, द्वितीय क्रमांक अनिल एकनाथ बोदाडे, तृतीय क्रमांक सागर ट्रेडिंग कंपनी मारुती हरी काळे, भुसार विभाग प्रथम क्रमांक सुरवसे आणि कंपनी राजेंद्र दामोदर सुरवसे, द्वितीय क्रमांक नकाते आणि कंपनी पांडुरंग सूर्यकांत नकाते, तृतीय क्रमांक मे. माळी आणि कंपनी शरण्णाप्पा रामचंद्र माळी,
उत्कृष्ट खरेदीदार राहुल येलपले आकाश गुजर यांना मिळाले पुरस्कार विजेत्यांची स्मृतिचिन्ह भेटवस्तू फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सचिव सचिन देशमुख यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज