टीम मंगळवेढा टाईम्स ।
सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानी आ आवताडे यांच्या हाती दामाजीची सत्ता सोपवली मात्र गेल्या सहा वर्षात मनमानी कारभार करून दामाजी मोडकळीस आणला.
१९ हजार ५०० सभासदांना वगळण्याचा कुटील डाव रचला मात्र शरद पवार व अजितदादाच्या माध्यमातून त्या सभासदांचा आम्ही हक्क अबाधित ठेवला.
शेअर्स अपुरे म्हणून अनेकांना वगळले , ११ महिन्याचा कामगारांचा दिला नाही हे महापाप सभासद शेतकरी कामगार विसरला नाही या निवडणुकीत हिशोब चुकता करेल असे नगरसेवक अजित जगताप यांनी सांगितले.
समविचारी पॅनलच्या वतीने उचेठाण , बठाण, ब्रह्मपुरी, माचनुर, रहाटेवाडी, तामदर्दी,मुढेवाडी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे , अरळी, नंदुर, डोणज, या गावातील सभासदाच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर ऍड नंदकुमार पवार, शिवानंद पाटील, प्रा पी बी पाटील, तानाजी खरात, राजेंद्र पाटील, दयानंद सोनगे, भारत पाटील, भारत बेदरे, महादेव लुगडे, जालिदर व्हँनुटगी, सिद्धेश्वर धसाडे, संतोष सोनगे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते
समविचारीला सभासदांकडून आर्थिक मदत
दामाजी निवडणुकीत आ.समाधान आवताडे विरुद्ध समविचारी आघाडी मैदानात उतरली आहे. सभासद शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.
कारखाना बचावाची भूमिका मांडत असणाऱ्या समविचारी पॅनलला निवडणूक खर्चासाठी मुढेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांनी २१ हजाराची मदत पॅनल प्रमुखाकडे सुपूर्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज