टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात एका महिलेला पैशासाठी चार पाच लोकांनी घरी कोंडून ठेवून तिच्या पतीच्या डोक्याला रिव्हाँलवर लावून 10 लाखांची मागणी करून मारहाण केल्या प्रकरणी संदिपान मोहन वाडदेकर रा.फटेवाडी, दिपक वासुदेव वाडदेकर (रा.भक्ती मार्ग पंढरपूर), सुहास जाधव (रा. कुची ता.कवठेमहाकाळ) या व अन्य चार ते पाच अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी आण्णासो आसबे (वय 29 रा. सप्तसृंगी नगर, मंगळवेढा) याची दुसरी पत्नी रूपाली ही गेल्या पाच वर्षापासून छत्रपती पार्क येथे रहावयास आहे.
गेल्या 7 महिन्यापूर्वी पत्नीच्या भावाने तथा आरोपीने हात उसणे पाच लाख दिले होते. आठ दिवसांपूर्वी सदरचे पाच लाख व अन्य 3 लाख 25 हजार असे एकूण 8 लाख 25 हजार रूपये परत केले होते.
आरोपी अजून आणखी 10 लाख रूपये पत्नी रूपालीला वारंवार मागत होते. दिनांक 3 रोजी दुपारी 4 वाजता फिर्यादीची पत्नी रूपाली एकटी असताना पंढरपूर येथून आलेले अज्ञात व वरील आरोपीने घरी येऊन मारहाण करीत असल्याचा कॉल फिर्यादी आण्णासाहेब आसबे याला केला.
फिर्यादी व मित्र नितीन धनवडे मोटारसायकलवर घरी गेल्यावर आरोपींना माझी पत्नी रूपालीला घरात का कोडंले आहे असे विचारले असता हाताने, काठीने मारहाण केली. तु 10 लाख नाही दिले तर तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून आरोपीने इनिवा गाडीतून आणलेला रिव्हाँलवर फिर्यादीच्या डोक्याला लावला.
10 लाख दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणत असताना फिर्यादीचे मित्र सर्जेराव धोत्रे, सचिन वाकडे, तानाजी आसबे आदी आल्यावर सर्व लोक तिथून निघून गेल्याचे आसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पो.उ.नि. शेटे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज