मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यभरातील ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मराठवाड्यातील चार सहकारी पतसंस्थांसाठी अवसायक (लिक्विडेटर) नियुक्त केल्याची माहिती सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी संसदेत दिली.
ज्ञानराधा, जिजाऊ, शुभकल्याण व राजस्थानी या त्या चार सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून सदस्य व ठेवीदारांच्या पैशांची वेळेवर परतफेड करण्याची प्रक्रिया अवसायकाकडून केली जाणार आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यांत घोटाळे करणाऱ्या चार मल्टिस्टेट सहकारी संस्थांच्या ठेवीदारांचा मुद्दा लोकसभेत एका प्रश्नातून उपस्थित केला गेला.
या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सहकारमंत्री अमित शाह म्हणाले की, जिजाऊ माँसाहेब, ज्ञानराधा, शुभकल्याण आणि राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या चार संस्थांसाठी अवसायक म्हणजेच लिक्विडेटर नियुक्त केले आहेत.
संपत्तीच्या लिलावातून वा विक्रीतून फसवणूक झालेल्या ठेवीदारांना लवकरात लवकर त्यांचा पैसा परत मिळवून देण्यासाठी अवसायक कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संस्थांविरुद्ध विविध तक्रारींच्या आधारे, केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी महाराष्ट्र सरकारच्या सहकारी संस्था निबंधकांना बहु-राज्य सहकारी संस्था (एमएससीएस) कायदा, २००२ अंतर्गत तपासणी करण्याची विनंती केली होती.
तपासणी अहवालानंतर, संबंधित कायद्यांतर्गत गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत या संस्थांना आक्षेपाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या.
पण या संस्थांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, म्हणून एमएससीएस कायदा, २००२ च्या कलम ८६ अंतर्गत प्रक्रिया गुंडाळण्याचे आदेश पारित करण्यात आले.
मराठवाड्यातील ४ संस्था…४ हजार कोटींहून मोठा घोटाळा
बीडची ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी : सुमारे ३५०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.
बीडची जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी: ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अध्यक्ष बबन शिंदेसह संचालक मंडळावर विविध ठिकाणी गुन्हे.
परळीतील राजस्थानी मल्टी. को-ऑप. सोसायटी: ३५० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणीला जालन्यात मार्चमध्ये अटक
संभाजीनगरातील शुभ कल्याण मल्टी. को-ऑप. सोसायटी : विविध जिल्ह्यांतील ठेवीदारांची फसवणूक, संचालक मंडळाविरोधात अनेक ठाण्यात गुन्हे दाखल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज