मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लग्न कार्यात महिलांची तयारी सुरू असतानाच अज्ञात महिला चोरट्याने नवरी मुलीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यातील वाखरी व भोसे येथे गुरुवारी दुपारी घडला.
यामध्ये दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे पाच लाख रूपयांचे ८ तोळ्याचे सोन्याचे दागिणे हातोहात लंपास करण्यात आले.
पंढरपूर-पुणे पालखी मार्गावरील वाखरी येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे गुरुवार वाखरी येथील लक्ष्मण श्रीरंग पोरे यांच्या मुलाचा विवाह महिला नातेवाईकाकडे ठेवण्यासाठी दिलेले होते.
यादरम्यान नवरी मुलीच्या कडील मंडळींनी दागिने व साडी मागितली आहे, असे सांगून पावणे पाच तोळ्याचे गंठण, नेकलेस तसेच जोडवे व बिचवा असे सुमारे अडीच लाखाचे दागिने अज्ञात महिला चोरट्याने लंपास केले.
ही घटना पावणे अकराच्या सुमारास उघडकीस आली.
दुसऱ्या चोरीच्या घटनेत भोसे (क.) येथील रायगड लॉन्स मंगल कार्यालयाच्या ठिकाणी जाधववाडी ता. पंढरपूर येथील रावसाहेब दत्तात्रय भोसले यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्या दरम्यान दुपारी सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान मंगल कार्यालयात बसलेल्या रावसाहेब यांच्या
आईच्या जवळ असणाऱ्या पिशवीतून ३.३ तोळ्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केले. दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार समोर आला. याप्रकरणी रावसाहेब भोसले यांनी करकंब पोलिसात फिर्याद दिली आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज