टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षाकरीता २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व ५ टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत
शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन आदि वैयक्तीक ग्रामीण भागातील दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थी योजनांचे अर्ज स्विकारण्याची
अंतिम दि.३१ ऑगस्ट असून उर्वरीत राहिलेल्या नागरिकांनी तात्काळ अर्ज सादर करावेत असे आवाहन गट विकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग या अंतर्गत सन २०२५-२६ या सालासाठी मागासवर्गीय कल्याण निधी व अपंग कल्याण निधी अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या ठराव, बँक रेशनकार्ड, योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
यासाठी मागासवर्गीय व अपंग व्यक्तीनी छापील नमुन्यात व अन्य कागदपत्रासह अर्ज करावेत. यासाठी जातीचा दाखला, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, ग्रामसभेचा पासबुक, आधार, अपंगानी ४० टक्के च्या पुढे दिव्यांग असलेले प्रमाणपत्र आदि कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
यामध्ये मागासवर्गीयाना २० टक्के योजनेत शेळी गट (४ शेळया व एक बोकड), मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी प्रशिक्षण, टॅली प्रशिक्षण, महिलांना शिलाई मशीन खरेदी करीता अनुदान,
महिलांना मल्टी पर्पझ पल्वरायझर मशीन खरेदी करीता अनुदान, झेरॉक्स मशीन करीता अनुदान, महिलांना सोलर ड्रायर / डिहायड्रर मशीन खरेदी अनुदान, दिव्यांगाना-शेळीगट (४ शेळ्या व एक बोकड), झेरॉक्स, गिरणी, दिव्यांग समुहांना मशीन, पिठाची स्वयंसहाय्यता अर्थसहाय्य, दिव्यांगांना ई मोशन व्हेईकल आदि साहित्याचे
वैयक्तीक वाटप करण्यात येणार असून मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयातील समाज कल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक किशोर सातव यांच्याशी संपर्क साधून दि.३१ ऑगस्ट पुर्वी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विविध योजनांचे फॉर्म सर्व ग्रामपंचायतींना पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदरच्या अर्जाची अंतिम मुदत दि.३१ ऑगस्ट पर्यंत असेल यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची सर्व पात्र लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण विभाग पंचायत समिती मंगळवेढा कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज