टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी नगरमध्ये सध्या नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून, शासनाकडून या भागात जल जीवन योजने अंतर्गत आंधळगाव व १३ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या
उचेठाण ते जल शुद्धीकरण केंद्र जुना मारापूर रस्ता या पाईप लाईनला बायपास करून पाणी द्यावे तसेच टँकर सुरू करून येथील पाणी टंचाई दूर करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी उपविभागीय अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मंगळवेढा यांच्याकडे केली आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू
लागली आहे. येथील श्री संत दामाजी नगरमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही योजना नाही. येथील नगरपालिकेकडून काही भागात नगरपालिकेपेक्षा दुपटीने पाणीपट्टी आकारणी करून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
तसेच काही भागात नागरिकांनी स्वतः खर्च करून वैयक्तिक विंधन विहिरी घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. परंतु हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाण्याची टंचाई जाणवत आहे.
शासनाने दामाजी नगर ग्रामपंचायतसाठी पाणीपुरवठा व्हावा यासाठी जल जीवन अंतर्गत आंधळगाव व ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनामधून ३१५००० लिटर्स क्षमतेची उंच टाकी प्रस्तावित केली आहे.
सदर योजना सर्व्हेनुसार संत दामाजीनगर हद्दीमधील मंगळवेढा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये टाकीची जागा निश्चित करून योजना मंजूर केलेली होती. परंतु संत दामाजीनगर ग्रामपंचायतीकडून दि. १३ सप्टेंबर २०२२ पासून एमआयडीसीकडे पाण्याची टाकीला लागणारी जागा वारंवार मागणी करून देखील अद्याप एमआयडीसीकडून टाकीसाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे टाकीचे काम रखडले आहे.
सध्या संत दामाजी नगरमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असून गावाला दुसरा पाण्याचा स्रोत नाही. त्याचबरोबर संत दामाजीनगर हद्दीमधील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईनचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झालेले आहे.
तसेच उचेठाण ते जलशुद्धीकरण केंद्र जुना मारापूर रस्ता येथील नवीन पाईप लाईनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तसेच नदीतील जॅकवेलमध्ये नवीन मोटारी बसवण्याचे देखील काम सुरू आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत झालेल्या पाईप लाईनमधून पाणी टाकी उभारणी झाली नसल्यामुळे बायपास करून संत दामाजीनगर हद्दीमध्ये पाणीपुरवठा करून या भागातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी होत आहे. तसेच वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरू करावेत, अशी मागणी येथील सरपंच जमीर सुतार यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज