मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद शेटफळ येथे बंगल्याच्या बाजूस असलेल्या झाडावर चढून बंगल्याच्या छतावरून घरात प्रवेश करून
बेडरूममधील कपाटात ठेवलेले 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदिवसा घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द् गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, मागील आठवडयात रामकृष्ण नगर येथेे चोरीचा प्रकार घडला होता. हे चोरटे अदयाप सापडले नसताना आणखी चोरीचा प्रकार घडल्याने चोरीची मालिका संपता संपेना अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी बसवेश्वर सुडके हे व्यवसायाने शेतकरी असून महमदाबाद शे. येथे गावात दोन मजली बंगला आहे.
दि.19 रोजी सकाळी 8.00 वा. फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, आई वडील असे मिळून बंगल्याला कुलूप लावून शेतात कामाला गेले होते.
ही संधी साधून चोरटयांनी बंगल्याच्या शेजारी असलेल्या शो च्या झाडावरून बंगल्याच्या छतावर जावून घरात प्रवेश करून दुसर्या मजल्यावर कपाटात ठेवलेले सोन्याचे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे दागिने कपाटाचे कुलूप उघडून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान या मध्ये 12 हजार रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची गळयातील ठुशी,15 हजार रुपये किमतीची 5 गॅ्रम वजनाची गळयातील ठुशी, 24 हजार रुपये किमतीच्या 2 लेडीज अंगठया,
32 हजार रुपये किमतीचे 2 गॅ्रम वजनाचे चार सोन्याचे बदाम,40 हजार रुपये किमतीचे 5 गॅ्रम वजनाचे कानातील फुले,12 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची अंगठी असा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.
याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक शेटे हे करीत आहेत. दरम्यान दि.9 मे रोजी मंगळवेढा शहरातील रामकृष्ण नगर येथे बंगल्याच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून 2 लाख 31 हजार 741 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरटयांनी रात्री 11.30 वा. चोरून नेले होते.
या घटनेतील चोरटे अदयाप जेरबंद झाले नसताना पुन्हा भर दिवसा महमदाबाद शे.येथे चोरी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
यापुर्वी 11 चोर्यातील 2 मुले जेरबंद करूनही चोरीची मालिका संपता संपेना अशा भावना मंगळवेढेकरांकडून व्यक्त होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज