टीम मंगळवेढा टाईम्स ।
रेवेवाडी ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या मिटींगमध्ये रेशन दुकानाचे रजिस्टर न आणल्याच्या कारणावरुन राडा होवून सरपंच ब्रम्हदेव दाजी रेवे यांना प्लास्टिक खुर्चीने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहदेव अर्जुन लवटे,चंद्रकांत मारुती लवटे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील जखमी फिर्यादी हे रेवेवाडी गावचे सरपंच व दक्षता कमिटीचे अध्यक्ष आहेत. दि.18 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात दक्षता कमिटीची मिटींग चालू होती. दुपारी 12.30च्या दरम्यान
मिटींगसाठी जगन्नाथ रेवे,दत्ता लवटे, शंकर दुलगुडे, सिंधूबाई रेवे, लाह्यावा माने, सिध्दू वाघमोडे, रेशन दुकानदार सहदेव लवटे, चंद्रकांत लवटे, कविता रेवे, ग्रामसेवक एम.जी. पवार,तलाठी भाऊसो संपकाळ आदी या मिटींगला उपस्थित होते.
यावेळी रेशन दुकानदाराचे रजिस्टर तलाठी यांनी दाखविण्यास मागीतले असता रजिस्टर देत नाही असे म्हणाल्यावर फिर्यादी व तलाठी यावर म्हणाले की, तुम्हांला सहा दिवस अगोदर दप्तर घेवून येण्यासाठी नोटीस देण्यात आली होती,
तरी देखील तुम्ही का रजिस्टर आणले नाही? असे म्हणताच रेशन दुकानदार यांनी मी तुम्हांला दप्तर दाखविणार नाही असे स्पष्ट सांगीतल्यावर फिर्यादीने हे दुकान चांगल्या शिकलेल्या माणसांना चालवायला द्या असे म्हणताच
वरील आरोपींनी शिवीगाळ,दमदाटी करुन तिथे असलेली प्लास्टिक खुर्ची उचलून फिर्यादीच्या मांडीवर मारुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज