टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी अव्वल ठरले.
50 हजार 397 विद्यार्थ्यांपैकी 97 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल 99.80 टक्के लागला आहे. कोरोनामुळे यंदा बारावीची परीक्षा झालीच नाही.
दहावी, अकरावीच्या गुणांसह अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेत पुणे जिल्ह्याचा निकाल 99.72 टक्के तर नगर जिल्ह्याचा निकाल 99.78 टक्के लागला आहे.
परीक्षा न झाल्याने दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल ठरले आहेत.
राज्यातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा निकाल 99.81 टक्के इतका आहे. तर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्के आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रथमच घवघवीत यश मिळवत राज्यात नावलौकिक मिळवला आहे.
पुणे विभागात प्रथमच सोलापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. पालकांचे प्रयत्न अन् विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे परिश्रम, यातून हे यश मिळाले आहे.
सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्के
राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा निकाल तिसऱ्या क्रमांवर आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी (99.81 टक्के) या जिल्ह्यांनंतर सोलापूर जिल्ह्याचा निकाल 99.80 टक्के लागला आहे.- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज