मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे देशातील मध्यवर्ती बँक आहे. देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं.
ज्या बँकांकडून बँकिंग संदर्भातील नियमांचं उल्लंघन किंवा पालन केलं जात नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याच काम आरबीआयकडून केलं जातं.
ज्या बँकांकडून नियमांचं पालन होत नाही त्यांच्यावर आरबीआयकडून वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड आकरण्यात आल्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकं आरबीआयनं त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत.
आरबीआयच्या वेबसाईटनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड आणि महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, परळी वैजनाथ या बँकांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तीन बँकांवर वेगवेगळ्या कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्या बँकेला किती दंड आकारण्यात आला?
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडला आरबीआयनं 15 लाखांचा दंड केला आहे. तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर या बँकेला दीड लाख रुपयांचा तर महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,
परळी वैजनाथ या बँकेला 50 हजार रुपयांचा दंड आरबीआयनं केला आहे. आरबीआयनं या तीन बँकांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांच्या आधारे मौद्रिक कारणांसाठी दंड केला आहे.
आरबीआयनं महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परळी वैजनाथ यांच्यावर 7 जुलै 2025 च्या आदेशानुसार मॉनेटरी दंड 50 हजार रुपये ठोठावला आहे.
याचं कारण बँकेकडून आरबीआयच्या ‘एक्पोझर नॉर्म्स अँड स्टॅट्युटरी / ऑदर रिस्ट्रिक्शन्स-यूसीबी आणि इतर मार्गदर्शक सूचनांची पूर्तता न केल्यानं आकारण्यात आला आहे. आरबीआयनं बँकेच्या 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीचं परीक्षण करुन हा निर्णय घेतला आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 8 जुलै 2025 च्या आदेशानं दीड लाख रुपयांचा दंड केला आहे. बँकेनं आरबीआयच्या लोन अँड अॅडव्हानसेस टू डायरेक्टर्स, रिलेटीव्ह अँड फर्म्स संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पूर्तता न केल्यानं दंड आकारला आहे.
आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार बँकेला त्यांची बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली होती. संचालकांची कर्जे आणि कर्ज वितरणासंदर्भातील इतर मार्गदर्शख सूचनांची पूर्तता केल्यानं हा दंड आकारला गेला आहे.
आरबीआयनं सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडला बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या सेक्शन 5 (सीसीव्ही) (iii) आणि सेक्शन 56 या नियमांचं उल्लंघन केल्यानं 15 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज