mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कुणी छत देता का छत! दामाजी पंतांच्या छताची दुरवस्था, भाविक भक्तांची आर्त हाक; सिध्देश्वर आवताडे यांचा पुढाकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 26, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील संत दामाजी पुतळ्याचा कापडी छत फाटून गेला असून, कुणी छत देता का छत असे म्हणण्याची वेळ दामाजी पंतांच्या भाविक भक्तांवर आली आहे. पुतळा सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विठ्ठल भक्त दामाजीपंतांनी बिदर बादशहाच्या राजवटीत नोकरीत असताना या भागात पडलेल्या भयानक दुष्काळात बादशाहकडून होणाऱ्या कोणत्याही शिक्षेची तमा न बाळगता येथील जनता उपाशी मरू नये, यासाठी सरकारी धान्याची कोठारे खुली करून येथील जनतेचे अन्नावाचून होणारे हाल थांबवले होते.

त्यांच्या या सामाजिक कार्याची प्रेरणा, आदर्श मिळावा, त्यांचे विचार भावी पिढीला प्रेरक बनावे, यासाठी तत्कालीन काही समाज धुरीणांनी येथील दामाजी चौकात संत दामाजीपंत यांचा हात जोडून उभा असलेला पुतळा उभा केला आहे.

या पुतळ्याची देखभाल गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेकडून होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी दामाजीपंतांच्या पुतळ्यावरील पत्र्याचे छत खराब झाल्याने ते काढून टाकण्यात येवून, कापडी मंडप मारण्यात आला.

ऊन व पावसामुळे सद्या हा कापडी मंडप फाटला असून तो वाऱ्यावर उडत आहे. विकास कामांसाठी कोट्यवधी निधी खर्च होत असताना दामाजीपंतांच्या पुतळ्याचे शुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

दामाजी चौकातील संत दामाजी पंतांच्या चबुतऱ्याच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी ठेकेदारास नोव्हेंबर २०२० मध्ये वर्क ऑर्डर दिली आहे . त्यांनी अद्याप काम चालू केलेले नाही . याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून काम लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी दिले.

संत दामाजीपंत पुतळयाचे सुशोभीकरणाचे काम आठ दिवसात सुरु करावे ..अन्यथा लोकवर्गणीतून , स्वखर्चाने करण्यास परवानगी मिळावी : सिध्देश्वर आवताडे

दामाजी चौकातील श्री संत दामाजीपंताच्या पुतळयाचे सुशोभीकरणाचे आठ दिवसात चालू करावे अन्यथा आम्हाला लोकवर्गणीतून , स्वखर्चाने करण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

श्री दामाजीपंत हे मंगळवेढयाचे भूषण असून त्या थोर संताच्या वास्तव्यामुळे व त्यांनी मंगळवेढा परिसरासाठी बिदर बादशहाच्या राजवटीत कोणत्याही परिणामाची पर्वा न करता या भागातील दुष्काळी जनतेला सरकारी धान्याची गोदामे खुली करून जनतेला मदतीचा हात दिला होता.

त्यांच्या कार्याची दखल खुद्द विठुरायाला घ्यावी लागल्याची अख्यायिका आहे. दामाजीपंताच्या थोर कार्यामुळे त्यांना संतपद प्राप्त झाले. त्यामुळे येथील भाविकांनी त्यांचे मंदिर तसेच पुतळा उभा करून त्यांचे कार्याची दखल घेतली आहे.

त्यांची विठ्ठल भक्ती थोर असून पंढरपूर येथे येणारे भाविक भक्त मंगळवेढा येथे दामाजीपंतांच्या दर्शनासाठी येत असतात. वारकरी बांधवांमध्ये दामाजीपंतांचे स्थान अढळ असून मंगळवेढयाची अस्मिता म्हणून दामाजीपंत यांच्याकडे पाहिले जाते.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे येथे पर्यटन व्यवसायदेखील वाढू लागला असून दामाजीपंताची महती देश विदेशात गेली असल्याने मंगळवेढयाला संतभूमी म्हणून ओळखले जात आहे . परंतू गेल्या काही दिवसापासून दामाजी चौकातील संत दामाजी पुतळा सुशोभीकरण करण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे वारकरी व भाविक भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . नगरपालिका प्रशासनाकडून या सुशोभीकरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून वेळेवर केले जात नाही .

थोर संतांच्या पुतळयाची दुरावस्था आम्हा भाविकांना व मंगळवेढेकरांना पाहवत नसल्याने आम्ही नगरपरिषदेकडे अगोदरदेखील स्वखर्चाने अथवा लोकवर्गणीतून सुशोभीकरणाच्या कामासाठी परवानगी मागीतली होती . परंतू याची दखल घेतली गेली नाही .

आणि नगरपालिकेनेही काम केले नाही . त्यामुळे येत्या आठ दिवसात सुशोभीकरणाचे काम नगरपालिकेने सुरु करावे अन्यथा आम्हाला स्वखर्चाने अथवा लोकवर्गणीतून ते काम करण्यास परवानगी दयावी असे त्या निवेदनामध्ये सिध्देश्वर आवताडे यांनी म्हटले आहे .

यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक माळी , पोपट पडवळे , नितीन मोरे , संजय नागणे , ज्ञानेश्वर कोंडुभैरी , संभाजी घुले , संजय जगताप , अर्जुन ओमने , विरेंद्र राक्षे आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी पुतळा

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
Next Post
मेजवानी! मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट मध्ये मिळतीय ‘मैत्री मासांहारी स्पेशल थाळी

मेजवानी! मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट मध्ये मिळतीय 'मैत्री मासांहारी स्पेशल थाळी

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..