टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी ते नंदेश्वर या मार्गावर अवैध वाळू वाहतुक करणारा टेंपो पोलिसांनी पकडून वाळूसह १ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करून
वाहनचालक धनाजी महाकाळ, पप्पू देशमुख, आण्णा खिलारे, संभाजी (रा.वाढेगाव, ता.सांगोला) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, वरील आरोपी ७.३० वाजता गोणेवाडी ते नंदेश्वर जाणाऱ्या रोडवर एम एच १२ , जी . टी . ५३५२ या टेंपोमधून हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू बेकायदा वाहतूक करताना पोलिसांना मिळून आले.
पोलिसांनी १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे वाळूसह वाहन जप्त केले आहे. याची फिर्याद पोलिस शिपाई महेश कोरे यांनी दिल्यावर वरील चौघाविरूध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा -हास केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बठाण रोडवरून दररोज रात्री व पहाटे वाळूची वाहने मंगळवेढ्यात येत असतात कोणाच्या मुक-संमतीने ही वाहने मंगळवेढ्यात प्रवेश करत आहेत. हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आता लक्ष घालून या अवैध वाळू वाहतुकीबाबत ठोस पावले उचलावीत व कोणाच्या मुक-संमतीने हा प्रकार सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज