mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

यशस्वी वाटचाल! सोलापूर जिल्ह्यात 600 कोटींचा टप्पा पार केलेली एकमेव संस्था : धनश्री मल्टिस्टेट; बँकेचे बाराव्या वर्षात दमदार पदार्पण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 6, 2022
in मंगळवेढा, शैक्षणिक
धनश्री मल्टिस्टेट बँकेचे अकराव्या वर्षात दमदार पदार्पण; सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

काही अर्थ वाढवावा ! संसार सुखे करावा !! हे ब्रीदवाक्य घेऊन धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची 11 वर्षांपूर्वी स्थापना झाली. या संस्थेचा 11 वा वर्धापन दिन सोहळा आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर साजरा करत आहोत या निमित्ताने…

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व त्यांचे सहकारी संचालक मंडळ यांनी या अगोदर धनश्री महिला पतसंस्थेची स्थापना केली. परंतु पतसंस्थेच्या शाखा विस्तारास निर्बंध आल्याने सन २०११ साली धनश्री मल्टिस्टेट को- ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेची स्थापना केली.

संस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे,

ग्राहकांचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध

तो जोपासून खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू ठेवली आहे. आतापर्यंत सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी धनश्री मल्टिस्टेट ने आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत,

ग्राहकांना ३४ शाखांद्वारे मिळतेय बँकिंग क्षेत्रातील सेवा

मुख्य कार्यालयासह ३४ शाखांद्वारे ही बँकिंग क्षेत्रातील सेवा दिली जात आहे. एकीकडे सहकार क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने अनेकांची अवस्था बिकट झालेली पहावयास मिळते आहे. संस्था ही काटकसरीने व तितक्याच कटाक्षाने चालवली तरच संस्थेचे भवितव्य टिकून राहील.

सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांच्या कार्याचे कौतुक

हेच धर्य मनात ठेवून चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे व संचालक मंडळानी वाटचाल सुरू ठेवली आहे.  संस्थेचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यालयासह ३४ शाखांमध्ये जवळपास १५० हुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

क्युआर कोड सुविधा

धनश्री मल्टिस्टेट बँकेने सर्वप्रथम ग्राहकांच्या हितासाठी क्युआर कोड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधामुळे खातेदारांच्या खात्यात अवघ्या 5 सेकंदात पैसे जमा होत आहेत.

संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी देव

संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपल्यासाठी देव आहे असे समजून त्यांना चांगली सेवा देण्याचे काम इथला प्रत्येक कर्मचारी बजावत असतो. मग त्यामध्ये शाखाधिकारी पासून ते पिग्मी एजंट, शिपाई पर्यंतचा त्यामध्ये समावेश असतो.

व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा उपलब्ध

सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. ३४ शाखांमधून कोअर बँकिंग प्रणालीद्वारे ही सेवा दिली जात आहे. प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेत झालेला व्यवहार हा प्रत्येक ग्राहकांच्या दृष्टीने पारदर्शक होण्यास मदत ठरते.

मिनी एटीएम मशीनचीही सुविधा उपलब्ध

अन्य बँकेतील एटीएम कार्ड द्वारे पैसे काढण्यासाठी मिनी एटीएम मशीनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध

त्याचबरोबर बाहेरच्या बॅंकेत ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी आरटीजीएस व एनइएफटी सुविधा उपलब्ध आहे.

मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर

मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर असून जेष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के व्याजदर जास्त दिले जाते.

दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव

त्याचबरोबर रिकरिंग ठेव, दामदुप्पट ठेव, लखपती ठेव व कन्यारत्न रिकरिंग ठेव या सारख्या ठेवींही आकर्षक व्याजदरासह स्वीकारली जातात.

दिर्घमुदत, सोने तारण, वाहन तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध

त्याचबरोबर कर्जस्वरूपामधून वैयक्तिक, मध्यम, दिर्घमुदत तसेच सोने तारण व वाहन तारण कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.

आर्थिक वर्षात २ कोटी ७६ लाख इतका नफा

संस्थेचे ३१ मार्च अखेर ५५५ कोटी ठेवी होत्या त्यामध्ये गत वर्षीपेक्षा १४६ कोटी ठेवींची वाढ झाली होती. तसेच आर्थिक वर्षात २ कोटी ७६ लाख इतका नफा झाला आहे.

कर्जदारांकडून योग्य वसुलीचे नियोजन

संस्थेकडून देण्यात आलेल्या कर्जदारांकडून योग्य वसुलीचे नियोजन करून कर्जाची नियमितपणे परतफेड करून घेतल्याने संस्थेचा रिकव्हरी रेट सुध्दा चांगला आहे.

७०० कोटी ठेवीकडे वाटचाल

एकीकडे कोरोना काळात सर्वच स्तरावर आर्थिक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असतानाही धनश्री मल्टिस्टेटने खातेदारांना तत्पर सेवा देत त्यांचा विश्वास संपादन करून ७०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची घौडधौड सुरू

ठेवीदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेची घौडधौड सुरू आहे. यापुढेही खातेदारांचा असाच विश्वास कायम राहील हीच अपेक्षा आम्ही बाळगतो. आणि धनश्री मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेचा ११ वर्धापनदिनाच्या व विजयादशमी च्या सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतकांना खुप खुप शुभेच्छा..

संकल्पना : सरव्यवस्थापक मा.रमेश फडतरे

शब्दरचना : समाधान फुगारे, संपादक मंगळवेढा टाईम्स न्युज

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री मल्टिस्टेट बँक मंगळवेढा

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
Next Post
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात होमगार्डशी हुज्जत घालून शासकिय कामात आणला अडथळा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा