टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-ब्रम्हपुरी मार्गावर भरधाव वेगात आलेल्या कारने मोटर सायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटर सायकलस्वार प्रकाश मल्लेशा पाटील (रा.मुंढेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला असून

भरधाव वेगात व निष्काळजीपणाने वाहन चालविल्याप्रकरणी कार चालक शेषकुमार श्रीनिवासराव (बिरगुंडा जिल्हा रंगारेड्डी, राज्य तेलंगणा) याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत प्रकाश पाटील हे दि.१७ रोजी सकाळी १०.१५ वाजता कामानिमित्त मंगळवेढ्याकडे मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ ए.यू.९१२८ यावरुन मुंढेवाडीवरुन माचणूर मार्गे मंगळवेढ्याकडे जात असताना

ब्रम्हपुरी हद्दीतील इंडियन ऑईल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कार क्रमांक ए.ओ.४०, डी.बी. १७३८ चा चालक तथा आरोपी शेषकुमार श्रीनिवासराव याने लेनमधून जाणाऱ्या मोटार सायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने

मोटर सायकलस्वार रस्त्याच्याकडेने पडून उडून साईडपट्टीवर जखमी होवून जागीच मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयताचा चुलत भाऊ आऊबा पाटील यांनी मंगळवेढा पोलीसात दिली आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदर घटनेतील चालक आरोपी हा अपघातानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या पेट्रोल पंपाच्या समोर तीन आठवड्यात दोघा मोटर सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने दिवसभर या अपघाताबाबत या परिसरात चर्चा सुरु होती. सदर दोघांच्या मृत्यूनंतर हे ठिकाण अपघातग्रस्त ठिकाण म्हणून ओळखले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











