टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांमध्ये बुधवारी छाननी झाली. शहर उत्तरच्या कार्यालयात स्वराज्य पक्षाचे उमेदवार अमोल शिंदे यांनी वकील संतोष न्हावकर यांना हमरीतुमरी केल्याचे सांगण्यात आले. सोलापूर दक्षिणच्या कार्यालयात मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या संपत्तीच्या वादावर बराच वेळ सुनावणी झाली. अखेर कोगनुरेंचा अर्ज मंजूर झाला.
शहर उत्तर निवडणूक कार्यालयात छाननी सुरू असताना आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावतीने म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या अॅड. संतोष न्हावकर आणि अमोल शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला.
पोलिस आल्यानंतर दोन मिनिटांत विषय मिटला. तसेच दक्षिणचे मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी संपत्ती लपविल्याची तक्रार मिलिंद मुळे यांनी केली. यावर अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी युक्तिवाद केला, त्यांनंतर कोगनुरेंचा अर्ज मंजूर झाला.
मंगळवेढा–पंढरपूर : निवडणुकीतील सात अर्ज अवैध
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी ४० जणांनी ५१ अर्ज भरले होते. यापैकी छाननी प्रक्रियेत १ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत, तर ६ जणांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने अर्ज अवैध झाले आहे. ३८ जणांचे ४४ अर्ज वैध ठरले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने भगीरथ भारत भालके, वसंतराव दौलतराव देशमुख, डॉ. संजय कुमार श्रीमंतराव भोसले, शैला अनिल सावंत यांचा तर भालचंद्र यल्लाप्पा कांबळे (बहुजन समाज पार्टी), माधुरी दिलीप धोत्रे (मनसे), सुदर्शन पोपट भिंगारे (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
वय बसत नसल्याने तरुणाचा अर्ज अवैध
माढा : माढा विधानसभा मतदारसंघासाठी ३२ उमेदवारांकडून ४० अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह ३० उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मोहसिन शहाजान शेख यांचा भारतीय युवा जन एकता पार्टी यांचा वय २४ असल्याच्या कारणाने अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे तर श्रावण
गोरख सरवदे यांचा व अभिजित धनवंता पाटील यांचा अर्ज नामनिर्देशन पत्र एकाचा सूचकाने स्वाक्षरीत केल्याच्या कारणावरूना अवैध ठरवण्यात आला आहे. इतर उमेदवारांचे एबी फॉर्म नसल्याच्या कारणावरून अवैध ठरवण्यात आले आहेत. मात्र त्यांनी पूरक भरलेले अपक्ष अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
सांगोला : ८ अर्ज नामंजूर, ३२ मंजूर
सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी सांगोला तहसील कार्यालयात उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया कोणत्याही हरकतीविना पार पडली. यामध्ये ३७ उमेदवारांनी दाखल केलेल्या ४८ अर्जापैकी ३२ उमेदवारांचे ४० अर्ज मंजूर (वैध) केले.
तर पाच उमेदवारांचे अर्ज पक्षाचा एबी फॉर्म, एकाच पक्षातून दोन अर्ज, अपूर्ण माहिती, सूचक आदी कारणांमुळे नामंजूर केले असून तीन उमेदवारांनी दाखल केलेल्या दोन अजर्जापैकी एक अर्ज मंजूर केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितले.
यामध्ये शिवसेना उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील, उद्धवसेनेचे दीपक आबा साळुंखे पाटील, शेकापचे बाबासाहेब देशमुख, स्वराज्य निर्माण सेनेचे धनाजी दत्तात्रय पारेकर, बहुजन समाज पार्टीचे सुबराव पितांबर गडहिरे यासह ३२ उमेदवारांचे ४० अर्ज मंजूर (वैद्य) झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज