टीम मंगळवेढा टाईम्स।
लग्न करून नव्याने आलेल्या जोडप्याने नातेवाईकांच्या घरातील १ लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सोमनाथ हणुमंत शिंदे (रा.बेंबळे ता. माढा) व अल्पवयीन मुलगी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रियांका सुनिल शिंदे (रा.पाटखळ) यांच्याकडे फिर्यादीच्या पतीचा मावसभाऊ तथा आरोपी सोमनाथ शिंदे (रा.बेंबळे) व त्याच्या सोबत एक अल्पवयीन मुलगी घेवून पाटखळ येथे घरी आले होते.
यावेळी फिर्यादीने आरोपीस ही मुलगी कोण आहे असे विचारले असता आम्ही दोघांनी लग्न केले आहे. ही माझी बायको असल्याचे त्यांनी सांगितले.
तदनंतर दोघे जेवण करून घरात बसले होते. सायंकाळी ४.०० वा.यातील फिर्यादी ही जनावरांचे शेण घाण काढण्यासाठी घरातून बाहेर गेले.
यावेळी घरामध्ये आरोपीव्यतिरिक्त कोणी नव्हते. फिर्यादी शेणघाण काढून ५.०० वा. घरात परतल्यावर आरोपी व अल्पवयीन मुलगी दोघेही घरात दिसून आले नाहीत.
यावेळी फिर्यादीस घरातील कपाटात ठेवलेले ६० हजार रुपये किमतीचे दीड तोळयाचे गळयातील मणी मंगळसुत्र, २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळयाचे कानातील सोन्याचे वेल,
२० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळयाचे कानातील सोन्याचे झुबे असा एकूण १ लाखाचा मुद्देमाल कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला दिसून आला नाही.
फिर्यादीने सर्वत्र सोन्याचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे फिर्यादीची खात्री झाली की सोन्याचे दागिने हे वरील दोघांनी चोरून नेल्याने सदर दोघांविरूध्द चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज