mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज सरन्यायाधीश देणार शपथ; असा होईल सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 25, 2022
in राष्ट्रीय
Breaking! द्रौपदी मुर्मू ठरल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती; कारकुन, शिक्षिका ते राष्ट्रपती, मुर्मू यांचा राजकीय प्रवास

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा यांच्याकडून त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल.

यासह त्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास रचणार आहेत. त्यांच्या आधी २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

मुर्मूंचे कुटुंबीय ओडिशातील रायरंगपूरहून दिल्लीत पोहोचले आहेत. मुर्मूंची वहिनी सुकरी टुडू यांनी त्यांच्यासाठी संथाली साडी आणली आहे.

मुर्मू ही साडी परिधान करून शपथ घेऊ शकतात. पूर्व भारतात संथाली साडी ही सणाच्या दिवशी परिधान करण्याची परंपरा आहे. या सोहळ्यात संथाली आदिवासी संस्कृतीची झलक दिसू शकते.

असा पार पडेल सोहळा

सकाळी ९.२५ वाजता मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील. गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. यानंतर १०.१५ वाजता सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा शपथ देतील. बरोबर ११.०० वाजता मावळत्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती भवनातून निरोप देण्यात येईल.

कोविंद यांचे अखेरचे संबोधन

रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती म्हणून देशाला संबोधित केले. ते म्हणाले, गावातील साधारण कुटुंबातून आलेले रामनाथ कोविंद देशवासीयांना संबोधित करत आहे,

यासाठी मी देशाच्या जागरूक लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला नमन करतो. माझा ठाम विश्वास आहे की, 21वे शतक भारताचे व्हावे म्हणून आपला देश सक्षम होत आहे.

सलग 10व्यांदा 25 जुलैला शपथ

मुर्मू या 25 जुलैला शपथ घेणाऱ्या दहाव्या राष्ट्रपती असतील. १९७७ नंतर प्रत्येक वेळी राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होत आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली.

त्याच दिवशी भारत प्रजासत्ताक झाला. दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर ते मे १९६२ पर्यंत या पदावर राहिले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १२ मे १९६२ रोजी शपथ घेतली आणि १३ मे १९६७ पर्यंत पदावर राहिले.

झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली.

त्यानंतर २५ जुलै रोजी ग्यानी झेल सिंग, आर वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, केआर नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

संबंधित बातम्या

Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
Next Post
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गिफ्टचे आमिष दाखवून सोलापुरच्या महिलेला 21 लाखांना फसविले; चौघावर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा