टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. तर आज देखील राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
हवामान खात्याने आज ठाणे, रायगड, रत्नागिरि या ठिकाणी येलो अलर्च जारी करण्यात आला आहे. विसर्जनाच्या वेळी पावसाने ठिकठिकाणी धुमाकुळ घातला होता.
राज्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी परतीचा पाऊस पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने जारी केल्यानुसार आज ठाणे, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी यलो अलर्ट आहे. विजांच्या कडकडाती सह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल या ठिकाणी मुसळधार पाऊस होता.
मुंबईत आज हलका पाऊस असणार आहे. मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. रत्नागिरीत देखील आज यलो अलर्ट जारी केला आहे.
मान्सून पश्चिमेकडे सरकत असल्याने राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. तर काही ठिकाणी परतीचा पाऊस पाहायला मिळला आहे. पुणे आणि आसपासच्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज