मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांची सोलापूर येथे बदली झाली असून त्यांचेजागी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले प्रदिप शेलार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासन सचिव मनिषा जायभाये यांना काढला आहे.
प्रदिप शेलार यांनी यापुर्वीही मंगळवेढ्याचे म्हणून काम तहसिलदार केले असून तहसिलदारपदाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.
मंगळवेढा तालुकातून बेसुमार होण्याच्या वाळू उपशामुळे मंगळवेढ्याची प्रतिमा मलीन झाली असून महसूल विभाग सर्वत्र चर्चेचा विषय बनला असताना वाळू चोरी, अवैध मार्गाने होणारा वाळू उपसा रोखण्याचे आव्हान नूतन तहसिलदार शेलार यांचेसमोर आहे.
कोर्टात जाणार
माझा कार्यकाळ पूर्ण न होता माझी बदली झाली आहे यासंदर्भात मी कोर्टात जाणार असल्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले.
कोण आहेत शेलार?
लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून; तहसीलदार शेलार हे मंगळवेढ्यात हजर झाले होते
वर्षांपूर्वी मंगळवेढा महसूल प्रशासनाचा कारभार हाती घेतलेले युवा तहसीलदार प्रदीप शेलार यांनी झालेल्या बदलीविरोधात मॅटमध्ये धाव घेऊन बदलीला स्थगिती मिळवल्याने त्यांच्याविरोधात तक्रारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांनी दिलेली ही चपराकच म्हणावी लागेल.
मात्र, त्यांच्या बदलीला तहसीलदार शेलार यांनी मॅटमध्ये जाऊन आव्हान देत स्थगिती मिळवली व परत तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज