टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. खात्यात दीड हजार रुपये की २१०० रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणीत रंगली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत.
जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तालुक्यात ६१ हजार महिला पात्र ठरलेल्या आहेत. मात्र पात्र ठरलेल्या बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला व दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत.
दरम्यान आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याचे प्रतीक्षा बहिणींना आहे
२१०० रुपये देण्याचे आश्वासन…
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते
आता महायुतीचे सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का अशीही चर्चा लाडक्या बहिणी मध्ये सुरू आहे. डिसेंबरचा हप्ता दिल्यास तो दीड हजार रुपये प्रमाणे दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज