मंगळवेढा टाईम्स न्युज नेट्वर्किंग ।
जागेमुळे प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात कृषी विभागाऐवजी कृष्ण तलावालगतच जागा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात बैठक मुंबई येथे घेण्यात आली.
त्या बैठकीमध्ये स्मारक समितीची माजी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,
अँड.शिवानंद पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव सुनील कोटेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित असून, तत्काळ त्यावर सोलापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आषाढी वारीसाठी आल्यावर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर चालू अधिवेशनात विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर तातडीने कार्यवाही करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चालू अधिवेशनादरम्यान मुंबई येथील बैठकीमध्येत बसवेश्वर स्मारक समितीच्या जागेसंदर्भातील प्रश्न तत्काळ मार्गी लावताना
कृष्ण तलावालगतची जागा निश्चित करून उपलब्ध जागेनुसार स्मारक उभारण्याचा आराखडा पंधरा दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याबरोबर चोखोबा स्मारकाचा आराखडाही सादर करावा.
तज्ञांच्या मदतीने आराखडा तयार होणार
मुख्यमंत्र्याच्या सोलापूर दौऱ्यावेळी केलेली मागणी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कृष्ण तलावाच्या परिसरातील जागा निश्चित करून काही तज्ञांच्या मदतीने आराखडा तयार होणार आहे. त्यामुळे स्मारकाचा प्रश्न येत्या काही दिवसांत मार्गी लागणार आहे.- शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष भाजप.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज