टीम मंगळवेढा टाईम्स ।
नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखरसंस्था असून प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे परिषद. अशा ह्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा उमेदवारांना विजयी करा असे आवाहन सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नटराज पॅनल दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने आज मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल येथे उमेदवार तेजस्विनी कदम यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
व्यासपीठावर अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, तेजस्विनी कदम, सभापती सोमनाथ आवताडे, विश्वनाथ आवड, दिलीप कोरके, अजय दासरी, समद फुलमामडी, विजयकुमार साळुंखे, संपादक दिगंबर भगरे, यतीराज वाकळे आदीजन उपस्थित होते.
प्रशांत दामले पुढे बोलताना म्हणाले की, आता ही तालीम असून पहिला प्रयोग 16 एप्रिल ला होणार आहे. अनेक प्रेक्षकांना भेटता आले त्याच्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेता आल्या.
निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून अनेक बदल घडवणार आहोत, पुढील काळात सक्षम होऊन नवीन कलाकार व ग्रामीण भागात संमेलन घेता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात रंगकर्मी खूप आहेत. सगळीकडेची मंडळी मुंबईत येत असतात, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना पाठबळ देणार.
सोलापूर जिल्ह्यातील 6 उमेदवार अत्यंत हुशार आहेत. ग्रामीण भागाशी निगडित आहेत. ही काम करणारी मंडळी असल्याचे सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.
तेजस्विनी कदम बोलताना म्हणाल्या की, विद्यार्थी शिक्षक नाटकाची आवड मंगळवेढा मधून सुरवात झाली आहे. कलाकारामध्ये संस्कृती आहे. आमच्या भागात अनेक नाटक प्रेक्षक आहेत.
ग्रामीण भागात नाटक रुजले पाहिजे यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे संमेलन मंगळवेढा येथे द्या अशी मागणी त्यांनी केली. नटराज पॅनलच्या माध्यमातून आम्ही सोलापूर जिल्ह्यामधील सांस्कृतिक चळवळ पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे सर यांनी केले तर आभार आर के जाधव यांनी मानले.
हे आहेत उमेदवार
तेजस्विनी कदम, विश्वनाथ आवड, दिलीप कोरके, अजय दासरी, समद फुलमामडी, विजयकुमार साळुंखे,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज