टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा वैद्यकीय अधिकारी सेवक सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक डॉ.नंदकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे.
संचालक मंडळ निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या निवडणुकीत डॉ.नंदकुमार शिंदे, डॉ.रमेश खंदाड, डॉ.एकनाथ बोधले, डॉ.बापू ओव्हाळ, डॉ.शिवाजी थोरात, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.अरुण पाथरूडकर,
डॉ.मोहन शेगर, डॉ.विनोद अभिवंत, डॉ.अश्विन करजखेडे, डॉ.केरू खारे, डॉ.नीलम यादव, डॉ.अनिसा तांबोळी यांची बिनविरोध निवड झाली.
अतिशय प्रामाणिकपणे व सचोटीने काम करून संस्था सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, सातारा व लातूर या कार्यक्षेत्रात विस्तारली.
मागील कामांमुळे वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेची निवड बिनविरोध झाली. या निवडीसाठी शीतलकुमार जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
डॉ.नंदकुमार शिंदे यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज