टीम मंगळवेढा टाईम्स ।
”जे उमेदवार मराठा आरक्षण लढ्याच्या बाजुने आहेत व पुढे मराठा आराक्षण चळवळीसाठी पाठिंबा देणार आहेत. त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने आपली ताकद उभी करावी.”
मराठा आरक्षण लढ्यातून पुढे आलेल्या जरांगे-पाटील पॅटर्न राज्यात चांगलाचा गाजू लागला आहे.
या पॅटर्ननुसार जिल्ह्यातील ११ ही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये बार्शी मतदारसंघातून राजा माने तर माढा मतदारसंघातून श्रीमंत कोकाटे यांचे नाव चर्चेत आहे.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेत जिल्ह्यातील ३० इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व कार्यअहवाल समन्वयकासमोर सादर केले होते. तर १२० जणांनी यापूर्वीच अंतरवाली सराटी येथे १२० जणांनी अर्ज व कार्यअहवाल दाखल केले होते.
या इच्छुक उमेदवारांमध्ये माढा मतदारासंघातून इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व बार्शी मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची नावे आहेत.
तर पंढरपूर मंगळवेढा मधून माऊली कोंडूभैरी, अजित जगताप, याशिवाय जिल्ह्यातून मारुती गायकवाड, प्रा. रणजित जगताप, प्रा. दीपक पाटील, बाळासाहेब बागल हे देखील इच्छुक आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांनी जिथे समाजाची ताकद आहे तिथेच उमदेवार द्यावेत, असे सांगितले आहे. दुसरीकडे जिथे एस.सी. एस.टी. यांचे आरक्षण आहे तिथे शक्यतो उमेदवार देऊ नयेत. आरक्षण चळवळीला धक्का लागेल असा एकही उमेदवार देऊ नये, असे सांगितले आहे.
जे उमेदवार मराठा आरक्षण लढ्याच्या बाजुने आहेत व पुढे मराठा आराक्षण चळवळीसाठी पाठिंबा देणार आहेत. त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने आपली ताकद उभी करावी. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या स्टँपवर तसे लिहून घ्यावे, असा आदेश मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही.
मराठा आरक्षण लढ्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीवर अगदी सुरवातीपासून आहे. यातून माझे नाव पुढे आले असेल. निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही. पुढील समीकरणे पाहून उमेदवारीबद्दल निर्णय घेतला जाईल. – राजा माने, ज्येष्ठ पत्रकार
सर्वसमान्यांचा कळवळा असणारी माणसे विधीमंडळात जाणे आवश्यक
चांगल्या माणसांनी राजकारणापासून दूर राहिल्याने बदमाशांचे राज्य येते, असे तत्ववेत्ता प्लटो यांनी सांगितले आहे. संसदीय लोकशाहीतून तयार झालेल्या नव सरंमजदारांनी कायम सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे शोषण केले आहे. महायुती गेली की महाविकास आघाडी येते. यामुळे सर्वसमान्यांचा कळवळा असणारी माणसे विधीमंडळात जाणे आवश्यक आहे. – श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज