टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कामे अनिल दादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याची घोषणा भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केली आहे.
शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे अनिल दादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, श्री.संत दामाजी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अँड.नंदकुमार पवार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शिरणांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, जमीर इनामदार
पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील , शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, फिरोज मुलाणी,चंद्रकांत गरंडे, पैलवान दामोदर घुले, नारायण गोवे, दामाजी शुगरचे माजी संचालक बळवंत पाटील, सुरेश कांबळे, सुदर्शन महाराज, स्मिता अवघडे, नागणे, सावंजी आदीजन उपस्थित होते.
अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, जनतेच्या सुख दुःखात आम्ही कायम सोबत असणार आहोत. लोकांची सर्व कामे आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत.
येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून मिसळून जनतेची कामे मार्गी लावणार आहोत. आगामी काळातील सर्व निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहोत. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहेत ते कायम जनतेसाठी सुरू राहणार आहेत.
राहुल शहा बोलताना म्हणाले की, गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने आम्ही लढत दिली आहे. आगामी नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका सर्वांनी मिळून लढाच्या आहेत. तालुक्यातील जनता आपले पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले.
प्रा.येताळा भगत बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक वाड्या वस्ती वरील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फिरोज मुलाणी बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी अनिल दादा सावंत हे प्रयत्न करत आहेत पण आता आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात अनिल दादांना आमदार करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अँड.घुले बोलताना म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सोडून अनिल दादा जनतेसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, येणाऱ्या काळात या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागतील. अनिल दादा सोबत प्रत्येक लढाईत सोबत असणार आहे. भूमिका स्पष्ट करून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज