मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
तुम्ही आतापर्यंत पिसाळलेला कुत्रा लोकांना चावा घेत असल्याच्या बातम्या वाचल्या असतील, ऐकल्या असतील. पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास असलेल्या परिसरामध्ये कुत्र्याचं नख लागलं तरी रेबीजचं इंजेक्शन घेतलं जातं अशा बातम्याही यापूर्वी आल्या आहेत.
मात्र महाराष्ट्रातील नांदेडमध्ये चक्क एका म्हशीच्या मृत्यूनंतर गावातील 180 जणांनी रेबीजचे इंजेक्शन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या संपूर्ण पंचक्रोषीमध्ये या गावाची चर्चा आहे. बरं गावकऱ्यांनी एक म्हैस मेल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन का घेतलंय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. यामागे एक फारच विचित्र आणि वेगळं कारण आहे. याबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे…
नेमकं गावात झालंय काय?
नांदेडमधील एका गावातील म्हैस दगावल्याने अख्खे गावच चिंतेत पडले आहे. त्याचे कारण म्हणजे या म्हशीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. या म्हशीच्या मृत्यूनंतर कुत्रा चावल्याने म्हैस दगावली अशी चर्चा गावात सुरु झाली. कुत्रा चावल्याने म्हैस मेल्याची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरली अन् या म्हशीचे दूध पिणारे भयभीत झाले. त्यानंतर संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.
त्या अहवालाने खळबळ
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हा विचित्र प्रकार घडला आहे. बिल्लाळी येथील किशन इंगळे यांची म्हैस चार दिवसांपूर्वी मरण पावली. महिनाभरापासून ही म्हैस आजारी होती. पशु वैद्यकीय डॉक्टरनी तपासणी केल्यावर या म्हशीला रेबीज सदृश्य लक्षणे आढळली. या महिनाभरात बल्लाळी गावातील शेकडो जणांनी म्हशीचे दूध किंवा चहासाठी वापर करून प्यायले होते.
180 जणांना रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं
म्हशीचा मृत्यू कुत्रा चावल्याने झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली. मग काय गावात खळबळ उडाली. गावात आरोग्य पथक दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून 180 गावाकऱ्यांना अँटी रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. या म्हशीचे दूध किंवा त्यापासून चहा पिल्याचा संशय असणाऱ्याना अँटी रेबीजचे इंजेक्शन देणे अजूनही सुरु आहे.
रेबीजची लक्षणं काय?
रेबीजची लक्षणे ही सुरुवातीला फ्लूसारखी असू शकतात, असं सांगितलं जातं. यामध्ये ताप, डोकेदुखी, आणि अशक्तपणा यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. कालांतराने अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात ज्यामध्ये चावलेल्या ठिकाणी मुंग्या येणे, अतिउत्साह, अर्धांगवायूचा झटका आणि घाबरुन झाल्यासारखं होणं याचा समावेश असतो.
1) नांदेडमधील गावात नेमके काय घडले आहे?
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात एका म्हशीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. या म्हशीला कुत्रा चावल्याने रेबीज झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय तपासणीत दिसून आली. यामुळे त्या म्हशीचे दूध पिणाऱ्या गावकऱ्यांमध्ये भीती पसरली, आणि 180 जणांनी खबरदारी म्हणून अँटी-रेबीज इंजेक्शन घेतले.
2) गावकऱ्यांनी रेबीजचे इंजेक्शन का घेतले?
म्हशीचा मृत्यू कुत्रा चावल्याने आणि रेबीजमुळे झाल्याची चर्चा गावात पसरली. या म्हशीचे दूध किंवा त्यापासून बनवलेला चहा प्यायलेल्या शेकडो गावकऱ्यांना रेबीज होण्याची भीती वाटली. त्यामुळे खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी अँटी-रेबीज इंजेक्शन घेतले.
3) ही घटना कोणत्या गावात घडली?
ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात घडली आहे.
4) म्हशीच्या मृत्यूचे कारण काय होते?
बिल्लाळी गावातील किशन इंगळे यांच्या म्हशीचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला. ही म्हैस महिनाभरापासून आजारी होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला रेबीजसदृश लक्षणे आढळली, आणि कुत्रा चावल्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली गेली.
5) किती लोकांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले?
खबरदारी म्हणून बिल्लाळी गावातील 180 गावकऱ्यांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले. ज्यांनी या म्हशीचे दूध किंवा त्यापासून बनवलेला चहा प्यायला असल्याचा संशय आहे, अशा लोकांना इंजेक्शन देणे अजूनही सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज