mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक, सोलापूर
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

टीम मंगळवेढा टाईम्स । संपादक समाधान फुगारे 7588214814

कोणताही बाप आपल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, अंगावर चांगले कपडे असावेत, त्यांची चप्पल सुद्धा फाटकी तुटके असू नये याची काळजी घेतो.

स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही याची खबरदारी मुलींनी आणि मुलांनी घेतली पाहिजे असे परखड मत सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्रा.वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा येथे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने काल सकाळी इंग्लिश स्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बाप समजून घेताना या विषयावर ते बोलत होते.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250820-WA0076.mp4

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम, अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका प्रा तेजस्विनी कदम, अजिता भोसले,यतिराज वाकळे, रामचंद्र नेहरवे, ॲड.शिवाजी पाटील,

प्राचार्य राजेंद्र गायकवाड, रवींद्र काशिद, प्रा.राहुल जाधव सह राजेंद्र जाधव, अविनाश शिंदे, राजेंद्र चेळेकर, लक्ष्मण माने, कल्याण भोसले, युवराज मोरे, मारुती लवटे, माजी सैनिक संघटनेचे मलय्या स्वामी आदीजन उपस्थित होते

इंग्लिश स्कूल प्रशालेत शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अकॅडमिक प्रमुख डॉ. मीनाताई कदम यांनी केले.

पुढे बोलताना हंकारे म्हणाले की, तुम्ही कोण आहात? माझा बाप कोण आहे? माझा बाप माझ्यासाठी काय करतो? याचा विचार प्रत्येक मुलीने अंतर्मुख होऊन केला पाहिजे. एकदा तरी बाप झोपल्यावर रात्रीच्या दोन वाजता उठून त्याच्याकडे बघा. त्याच्या पॅन्ट व बनियनला चार जागेवर ठिगळं दिसतील.

मात्र तोच बाप तुम्हाला फॅन्सी व नवनवीन कपडे घालून शाळेत व काॅलेजला पाठवतो. आता आम्हाला प्रबोधनाची गरज नाही असा विचार न करता. तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे, त्याला परिवर्तन म्हणतात.

ते परिवर्तन झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती बदलला पाहिजे, प्रत्येक लेकराच्या काळजामध्ये परिवर्तनाची आग लागली पाहिजे. २१ व्या शतकामध्ये मोबाईल मुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर मुलींसोबतच मुलांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हंकारे यांनी गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, फुले-शाहू – आंबेडकर, सावित्रीआई फुले, ताराराणी, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचा अंगावर शहारे आणणारा आणि क्रांतीची मशाल पेटवणारा इतिहास सादर केला.

सावित्रीच्या लेकींनो स्वतःच्या मनाला विचारा, स्वतः उपाशीपोटी, उघड-नागडं वावरत रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप समजून घ्याल का? खरंच तुम्हाला बाप समजला का? अशी काळजाला भिडणारी आर्त साद त्यांनी मुला- मुलींना घातली.

शेवटी बोलताना हंकारे यांनी सांगितले की, शाळेत चार मार्क कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका.

‘बाप समजावून घेताना’ या विषयावर बोलत असताना अनेक उदाहरणे, काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले.

यावेळी उपस्थित विद्यार्थिनी, बहुसंख्येने आलेला पालकवर्ग, महिला अक्षरशः ढसाढसा रडत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वं मुला-मुलींना डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला लावले त्यानंतर आपल्या बापाला आठवा आणि बाबा मी तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही. समाजापुढे तुम्हाला मान खाली घालून वागावे लागेल असे कृत्य मी कधीच करणार नाही. अशी शपथ प्रा.हंकारे यांनी यावेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यींनींना घ्यायला लावली.

सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर आभार लता ओमने यांनी मानले कार्यकमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वसंत हंकारे

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 25, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 25, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

August 24, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मोठी खळबळ! मंगळवेढ्यासह ‘या’ तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

August 23, 2025
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

शेतकरी चिंतेत! हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात; मंगळवेढ्यातील ‘हे’ बंधारे पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

August 22, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला पैशासाठी चाबकाने मारहाण करत छळ; गळफास घेऊन महिलेने केली आत्महत्या

August 22, 2025

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 25, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 25, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

August 24, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मोठा धक्का! दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा