mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे शिबिर ठरले जगातील सर्वात मोठे; नॅशनल बुक रेकॉर्डकडून नोंद; शिवसेना नेते शिवाजी सावंत यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 12, 2023
in आरोग्य, सोलापूर
३ ठिकाणी २४ तास मोफत आरोग्य सेवा! फक्त कागदोपत्री नाही तर आम्ही प्रत्यक्ष काम करतो; लाखों वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी मिळाली : आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

यंदा पंढपूरच्या वारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या महाआरोग्य शिबिराची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली आहे.

‘इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ या पुस्तकात जगातील सर्वांत मोठे आरोग्य शिबिर म्हणून या आरोग्य शिबिराची नोंद करण्यात आलीये. यासंदर्भातील माहिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांनी माहिती दिली आहे.

आषाढी वारीच्या निमित्तने पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 11 लाख 64 हजार 684 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तर याकरिता 5 हजार 700 डॉक्टरांनी वैद्यकिय सेवा बजावली.

तसेच दोन लाख नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठई तब्बल 10 हजार कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी केल्यानंतर अनेकांना गंभीर आजाराचे देखील निदान झाले. अशा लोकांना पुढील उपचारांसाठी मोफत उपचाराची सोय देखील राज्य शासनाकडून करण्यात आली. या कार्याची दखल घेऊन या शिबिराची जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली आहे. अशा माहिती संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी दिली.

दरम्यान विठ्ठलानेच आमच्याकडून ही सेवा करुन घेतली अशी प्रतिक्रिया शिवाजीराव सावंत यांनी यावेळी दिली आहे.

वारकरी संप्रदायाचा आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वात मोठी यात्रा ही पंढपुरात भरते. त्यानिमित्ताने लाखो वारकरी पंढपुरात येत असतात. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून राबवण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला वारकरी संप्रदायाने देखील मोठा प्रतिसाद दिला होता.

तर कार्तिकी एकादशीच्या वेळेस देखील आमच्यासाठी मोफत तपासण्या आणि उपचार करण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उपक्रमामुळे भाविकांना देव दर्शनासोबत मोफत तपासणीचा देखील फायदा घेता आला. त्यामुळे वारकरी संप्रदायासह पंढपुरातील जनतेने देखील मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले.

आषाढी एकादशी निमित्त पहिल्यांदाच शिंदे फडणवीस सरकारने पालखी सोहळे निघाल्यापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही योजना राबवली.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यापासून या तपासण्यांना सुरुवात झाली होती. या संपूर्ण आरोग्यशिबिराची जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्यावर सोपवण्यात आली होती. या शिबिराचा अहवाल देखील राज्य शासनाकडून देण्यात आला होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरोग्य शिबीर

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची केलेली नेमणूक तात्काळ रद्द करा; प्रभाकर देशमुख यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा