टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील सर्व सरपंचांनी महावितरण विरोधात लढा सुरू केला. यामधील पहिल्या टप्प्याला यश आले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथ दिव्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतल्याने अक्कलकोटसह राज्यातील सर्व ग्राम पंचायतीने या निर्णयाचे स्वागत करत असल्याची माहिती सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिता मधुकर सुरवसे यांनी दिली आहे.
मागील व येथून पुढील राज्यातील पथ दिव्यांची थकबाकी व चालू बिले राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार व जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती यांच्याकडे अनुदान पाठवून प्रतिमहिना मागील व चालू वीज देयके पथ दिव्यांची हे
आता राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतल्याने सरपंच परिषेच्या लढ्यातील पहिल्या टप्प्याला यश मिळाले आहे.
शासन निर्णय ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी काल निर्गमित केला असून, राज्यातील बऱ्याच सरपंच यांनी पथ दिव्यांचे वीज कनेक्शन तोडू नये यासाठी उपोषण केले, त्या उपोषणाला यश आले.
आणि ग्रामविकास विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील पथ दिव्यांची वीज देयके भरण्याबाबतचा निर्णय घेतला.
सरपंच परिषदेचे पदाधिकारी राजू मगदूम यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून कोर्टात गावातील पोल, डी . पी . वीज उपकेंद्र यावरही कर लावता येतो , असे कोर्टामध्ये सांगितले.
हा महत्वपूर्ण निर्णय सरपंच परिषदेच्या बाजूने लागला. सरकारच्या वरील निर्णयाचे ग्रामविकास विभागाचे व ग्रामविकास मंत्री यांचे अभिनंदन केले.
सरपंच परीषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड . विकास जाधव, जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनी आभार मानले आहेत.
लवकरच सरपंचांमधून एक आमदाराची निवड व्हावी याकरिता सरपंच परिषद तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे वनिता सुरवसे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज