टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यातील वृद्ध कलावंतांना योजनेची रक्कम वाढवून त्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी सलगर खुर्दचे नागराज व्हनवटे यांनी फेब्रुवारी 2022 ला केली होती.
मार्च महिन्यात राज्य शासनाने जीआर काढत मागणी मान्य केली असल्याची माहिती नागराज व्हनवटे यांनी दिली आहे.
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
त्यासाठी १२५ कोटी रुपये इतक्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सध्या या योजनेत अ वर्ग कलावंतास ३१५०, ब वर्ग कलावंतास २७००, क वर्ग कलावंतास २२५० रुपये मानधन देण्यात येते.
वृद्ध कलावंताना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मानधन ५ हजार रुपये झाले आहे.
वृद्ध, महिला, दिव्यांग कलावंत ज्यात मृदुंगवादक, टाळकरी, कीर्तनकार, ढोलकी वादक, जागरण गोंधळी, साहित्यिक इत्यादी प्रकारांत कलावंत म्हणून ओळख असलेल्या 55 वर्षांपुढील लाभार्थ्यांना दरमहा मानधन दिले जाते.
या योजनेच्या लाभासाठी तालुका स्तरावर प्रस्ताव बोलावले जातात. ते पंचायत समिती स्तरावर स्वीकारले जातात. विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, कलावंत म्हणून काम केल्याचे काही पुरावे, कात्रणे, तसेच आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यापैकी एकाची शिफारस असलेले पत्र प्रस्तावासोबत जोडल्याचे निदर्शनास येते.
अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून कलावंतांनी त्या त्या पंचायत समितीत प्रस्ताव सादर करावे असे आवाहन देखील नागराज व्हनवटे यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्हनवटे यांनी मानले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज