टीम मंगळवेढा टाइम्स ।
चोरट्यांनी शटर उचकटून परमिट रूममधील जवळपास १ लाख १८ हजार रुपयांच्या मद्यसाठ्यासह सीसीटीव्ही चोरून पोबारा केला.
चोरट्यांनी यापूर्वी हेच परमिट रूम तीन वेळा फोडून लाखो रुपयांच्या मद्याची चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या.
चोरट्यांनी शुक्रवारी पुन्हा हेच परमिट रूम लक्ष्य करून चौथ्यांदा फोडल्याने गावात चांगलीच चर्चा रंगली.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री महूद अकलूज रोडवर हॉटेल अशोका गार्डन येथे घडली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार , अशोक तानाजी येडगे ( रा . महूद , ता . सांगोला ) यांच्या मालकीचे महूद अकलूज रोडवर परमिट रूम आहे. गुरुवार , दि . १५ मे रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी दिवसभर हॉटेल व्यवसाय करून रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी परतले अन् जेवण उरकून रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात झोपी गेले.
दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या परमिट रूमचे शटर उचकटले. स्टोअर रूममधील विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्यांसह सीसीटीव्ही चोरून पोबारा केला.
दरम्यान , शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचा शेतमजूर रामा दुर्वे यांनी अशोक येडगे यांच्याशी संपर्क साधून हॉटेलच्या शटरचा पत्रा उचकटल्याचा निरोप दिला.
त्यांनी तत्काळ परमिट रूमकडे धाव घेतली. स्टोअर रूममधील दारूच्या बाटल्या व सीसीटीव्ही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज